Sharad Pawar : नवी मुंबईत शरद पवारांना धक्का; ३० हून अधिक नगरसेवकांनी हाती घेतलं कमळ

navi mumbai : नवी मुंबईत शरद पवारांना धक्का बसला. यावेळी पक्षाचे ३० शिलेदारांनी साथ सोडली. या ३० माजी नगरसेवाकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
sharad pawar  news
sharad pawarSaam tv
Published On

नवी मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुका एप्रिल, मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचदरम्यान, भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ३० माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांनी घर वापसी केली आहे. तुतारी हातात घेणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत ३० नगरसेवकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. तसेच लवकरच संदीप नाईक यांची देखील घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 30 पेक्षा अधिक नगरसेवकांनी पुन्हा हाती कमळ घेतले आहे.

sharad pawar  news
Bihar Viral News: लग्नानंतर २ महिन्यातच पत्नीचं बिंग फुटलं, नवऱ्याने रंगेहात पकडले, पुढे जे झालं ते...

नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक यांनी विधानसभेवेळी राष्ट्रवादीत जाताना काही माजी नगरसेवक देखील सोबत गेले होते. अशात हे सर्व माजी नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या माजी नगरसेवकांच्या भाजप पक्षप्रेवेशावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. मंत्री गणेश नाईक यांची देखील या प्रवेशाला उपस्थिती होती.

sharad pawar  news
Viral News: 'आज आपल्या लग्नाची पहिली रात्र' तरूणानं फेसबुकवर फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले 'आता व्हिडिओ पाठवा'

३० नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर रविंद्र चव्हाण म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत काही नगरसेवक इतर पक्षात गेले होते. परंतु सर्व नगरसेवक पदाधिकारी या सर्वांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली'. संदीप नाईक यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर बोलताना रविंद्र चव्हाण यांनी मोठं भाष्य केलं. 'ज्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांनी प्रवेश केलाय. हे सर्व नगरसेवक होते. संघटनपर्व सुरु आहे त्यांची पुन्हा काम करण्याची इच्छा होती त्यामुळे प्रवेश केला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com