Bachchu Kadu On Amit Shah  Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu: शरद पवार सरदार तर मग अजितदादा कोण? शहांच्या टीकेवर बच्चू कडू यांचा तिखट सवाल

Bachchu Kadu: प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी अमित शहा यांच्या टीकेनंतर गुगली प्रश्न केलाय. जर शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर अजित पवार हे कोण असा तिखट सवाल त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

अमर घटारे, साम प्रतिनिधी

महायुतीमधील सहयोगी मित्र बच्चू कडू यांनी अमित शहा यांना तिखट सवाल केलाय. शरद पवार हे भ्रष्टचाराचे सरकार असतील तर मग अजित पवार कोण असा सवाल कडू यांनी केलाय. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू महायुतीवर नाराज आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे अमित शहा यांच्या टीकेवर बच्चू कडू यांनी दिलेली प्रतिक्रिया. अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर कडू यांनी प्रश्न केलाय.

माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले, शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहे? अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने निघालं असे. ते विसरभोळे आहेत बऱ्याचदा अमित शहा चुकीचे बोलतात मग नंतर अंगलट येत असतं अशी कोपरखळीही त्यांनी मारलीय. दरम्यान अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे आता अजित पवार यांनी परत शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिलाय.

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या अधिवेशनात बोलतांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. शरद पवार हे राज्यातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असल्याची टीका अमित शहा यांनी केली होती.

अमित शहांनी काय केले आरोप

विरोधक संभ्रम निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक भ्रष्टाचारावरुन सरकारला घेरत असतात. परंतु स्वतः शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार आहेत. शरद पवारांनी भ्रष्टाचाराच्या संस्था निर्माण केल्या, असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाय.

उद्धव ठाकरेंवर टीका

औरंगजेब फॅन क्लब जवळ उद्धव ठाकरे बसलेत. ते देशाच्या सुरक्षेची खात्री देऊ शकत नाहीत. देशाला सुरक्षा देण्याचं काम हे फक्त भाजपच करू शकते. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते झालेत. ज्यांनी कसाबला बिर्याणी दिली त्यांच्यासोबत उद्धव उद्धव ठाकरे बसलेत, अशी टीका अमित शहा यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT