Amit Shah: उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शहा पुण्यात कडाडले

Amit Shah On Uddhav Thackeray: औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे, अमित शहा पुण्यात कडाडले
Amit Shah On Uddhav ThackeraySaam Tv
Published On

'औरंगजेब फॅन क्लब भारताची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात, ते पीएफआयला पाठिंबा देत असून औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्याच्या विरोधात उभे आहेत आहे. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. आज पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केली आहे.

पुण्यात झालेल्या भाजपच्या सभेत अमित शहा म्हणाले की, ''महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या (लोकसभा) प्रचारात धावताना, घाम गाळताना, निकालासाठी प्रत्येक क्षणी झगडताना आपण पाहिले आहे. भाजपला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याने अतोनात परिश्रम घेतले, हे सांगण्यासाठी मी आज आलो आहे.''

औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे, अमित शहा पुण्यात कडाडले
Maratha Reservation: महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं तरच मराठा समाजाला आरक्षण मिळतं: अमित शहा

ते म्हणाले, ''पुणे हे बाळ गंगाधर टिळकांचे शहर आहे. याच भूमीने आपल्याला ‘केसरी’ हे वृत्तपत्र दिले आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा नारा दिला. मी बाळ गंगाधर टिळक, बाजीराव पेशवे आणि वीर सावरकर यांना नमन करून सुरुवात करू इच्छितो.''

अमित शहा म्हणाले, ''60 वर्षांनंतर देशातील कोणत्याही नेत्याला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा मान मिळाला असेल तर ते आपले नेते नरेंद्र मोदीजी आहेत.'' ते म्हणाले, ''भाजप कार्यकर्त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2014 आणि 2019 च्या विजयापेक्षा 2024 मध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.''

औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे, अमित शहा पुण्यात कडाडले
Devendra Fadnavis Speech: 'मैदानात उतरा, फुल बॅटिंग करा अन् ठोकून काढा', देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र; थेट भिडण्याचे आदेश

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, ''मी हे अत्यंत विचारपूर्वक सांगत आहे की, महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार येते तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते आणि जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com