मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी रान पेटवलंय. आरक्षण मिळावे म्हणून ते आक्रमक झालेत. त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलंय. महाराष्ट्र राज्यात जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं असं विधान अमित शहा यांनी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात केलंय.
विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी संविधान बदलाचा प्रचार केला. त्याला आम्ही उत्तर दिलं.आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यामुळे शरद पवार हे वेगवेगळं भ्रम तयार करत आहेत. मराठा आरक्षणावरुन शरद पवार जे भ्रम तयार करत आहेत, त्याला अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उत्तर देत आहेत. पण मराठा समाजाला आरक्षण भाजप तेव्हाच मिळते जेव्हा राज्यात भाजपचं सरकार येतं, असं शहा यावेळी म्हणालेत.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोधकांनी आपली भूमिका मांडावी असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना शरद पवारांनी सत्ताधारी लोकांनी भुमिका घेतली पाहिजे, विरोधकांच्या भुमिकेशी काय अर्थ नसतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन बोलतांना अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली. भाजप जेव्हा सत्तेत येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि जेव्हा शरद पवार सत्तेत येतात तेव्हा आरक्षण गायब होत असतं.
महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपचं सरकार होतं. त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता.त्यावेळी मराठा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तेव्हा भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं. नंतर शरद पवार यांचे सरकार आलं तेव्हा मराठा आरक्षण गायब झालं. आता परत आम्ही सत्तेत आलो तेव्हा आम्ही परत आरक्षण देण्याचं काम करतोय.
जर परत शरद पवार यांचं सरकार येईल तेव्हा परत आरक्षण गायब होईल,अशी टीका अमित शहा यांनी केली. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर परत एकदा भाजपला सत्ता द्या.समाजातील प्रत्यके घटकाला न्याय देण्याचं काम भाजपने केले आहे, त्यामुळे नागरिकांनी खोट्या प्रचारामुळे गोंधळून जाऊ नये असं आवाहनही शहा यांनी केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.