Sharad Pawar latest health update today saam tv
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; दुष्काळ दौरा रद्द

NCP Chief Sharad Pawar Admitted To Ruby Hall Clinic: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोकल्याचा त्रास आणि वैद्यकीय तपासण्या सुरू असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ तब्येतीच्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून तयांच्या काही वैद्यकीय चाचण्या सुरू असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार यांना सतत खोकल्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तीन दिवस दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे दर महिन्याला नियमित तपसणीसाठी रुबी हॉल रुग्णालयात जातात. आजही दुपारी चारच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांची नियमित तपासणी केली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्याची माहिती दिली. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. तसेच शरद पवार यांचे आगामी दुष्काळी भागातील दौरे देखील रद्द करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पॅनिक अटॅक म्हणजे नेमके काय? जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

NCP: अजित पवार गटात घडामोडींना वेग; खान्देशातील बड्या नेत्याच्या कमबॅकची जोरदार चर्चा, कोअर कमिटीच्या बैठकीत काय होणार निर्णय?

शिवसेनेच्या बड्या नेत्याने राजकारण सोडलं, कार्यकर्त्यांची होणारी कोंडी...; खंत व्यक्त करत सगळंच सांगितलं

Air Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलेली ही काळजी नक्की घ्या!

SCROLL FOR NEXT