Maharashtra Drought : राज्यात दुष्काळाचे संकट गडद! शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, सोलापूरसह धाराशिवला तातडीने मदत देण्याची मागणी

Maharashtra Drought Sharad Pawar News : महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गंभीर! शरद पवारांनी सोलापूर, धाराशिवमधील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी.
Sharad Pawar On Maharashtra Drought News
Sharad Pawar On Maharashtra Drought News AI image
Published On: 

Maharashtra Drought Sharad Pawar Solapur News राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडले असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी सोलापूर, धाराशिवसह इतर दुष्काळग्रस्त भागांत तातडीने मदत देण्याची गरज असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील १३९ गावांना दुष्काळाचा फटका बसला असून १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माढा तालुक्यातही पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याची गरज पवारांनी व्यक्त केली. दिवाळीनंतर पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.