Sharad Pawar Visit : शरद पवार जाणार शेताच्या बांधावर, ३ दिवस या ३ जिल्ह्यांचा दुष्काळी दौरा करणार

Sharad Pawar to visit drought hit farmers : शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. तीन दिवसांत तीन जिल्ह्यांचा दुष्काळी दौरा करणार आहेत. जाणून घ्या कसा असेल त्यांचा दौरा....

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार दुष्काळी भागात दौरा करणार आहेत. पुढील तीन दिवसांत ते तीन जिल्ह्यांतील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. सोलापूर, धाराशिव, बीडसह अहिल्यानगर या जिल्ह्यांत ते जाणार आहेत.

राज्यांत भयंकर दुष्काळ आहे. सरकारनं राज्यातील तीनशेहून अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारनंही अग्रीम मदत जाहीर केली आहे. दिवाळीआधी सरकारकडून अनेक मंत्री, विभागांचे अधिकारी, तसेच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुष्काळी भागांची पाहणी केली आहे. दुसरीकडे, दुष्काळी मदतीकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. आता राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देखील पुढील तीन दिवस दुष्काळी दौरा करणार आहेत. ते ३ जिल्ह्यांत जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पुढील तीन दिवस ते सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर येथे शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.