मागच्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज सर्व पक्षाच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून उद्या महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पक्षांतर पाहायला मिळाले. तिकीट न मिळणे, निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना उमेदवारी दिल्याने यंदा चांगलीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. तर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील असेच काहीसे चित्र अवघ्या राज्याने बघितले.
दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा हादरा बसला आहे. मतदानाला काही तास शिल्लक असतानाच आता बड्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार यांचे 42 वर्षांपासून असलेले खंदे समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडली आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यस्त्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीत हा राजीनामा आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
रमेश कदम यांचा चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कदम हे नाराज होते. पक्षात योग्य स्थान आणि सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी शदर पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत जाधव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. रमेश कदम हे 1984 पासून हे शरद पवारांसोबत होते. अजित पवार यांनी केलेल्या बंड केल्यानंतर अनेक बडे नेत्यांनी साथ सोडत घडयाळ हाती घेतले मात्र रमेश कदम हे शरद पवारांसोबत होते.
रमेश कदम म्हणाले, पक्षासाठी जे काही आवश्यक होते ते सर्व केले. मात्र आता पक्षात कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना किंमत उरलेली नाही तसेच 15 दिवस आराम करणार असून अजूनतरी कुठल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.