भाजपने शेवटच्या क्षणी काढलं मराठी कार्ड; मित्रपक्षाचा बडा नेताही फोडला

ravindra chavan political news : ऐन महापालिका निवडणुकीच्या क्षणी भाजपने मराठी कार्ड काढलं आहे. अजित पवार गटाचा बडा नेता देखील फोडला.
BJP Politics
BJP Saam tv
Published On
Summary

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलंय

भाजपचा पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

ठाकरे बंधूंवर मराठी मुद्द्यावरून भाजपकडून प्रत्युत्तर

मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. एकीकडे ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. तर भाजपही ठाकरे बंधूंना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. भाजप विचारधारेच्या उगमस्थानीच मराठी भाषा आहे, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलं आहे. दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बडा नेता फोडला.

भाजपने ऐन निवडणुकीत पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदीप गारटकर यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

BJP Politics
उमेदवाराची रास कोणती? कशी असेल निवडणूक, भाग्य उजळणार की आणखी काही...वाचा राशीभविष्य

ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं की,भाजपचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन प्रकारासारखे आहे. मराठी भाषेबाबतचा आमचा दृष्टिकोन व्यापक आहे. आमच्या भूमिकेत मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मराठी सकारात्मकता पसरवणारे आहे. यातून मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार अपेक्षित आहे'.

BJP Politics
ऐन निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; शिंदे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीला नवं वळण, नेमकं काय घडलं?

'मराठी भाषेचे राजकारणच करू नका. कारण हा विषामृत असा खेळ नाही. विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या "विश्वात्मके देवे" या वैश्विक तत्त्वाशी त्यांची बांधिलकी नसल्याचे प्रतीक आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.

'भाजप आणि मराठी माणूस दोन्ही वेगवेगळे नाही. वास्तविकपणे मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपची विचारधारा आहे. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी भाषिक थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित देश आणि समाज घडविण्याचे काम भाजप करत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

BJP Politics
प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

'केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या विकास आणि प्रगतीसाठी भाजप कटिबद्ध आहे. लोकांचं जीवन अधिक सुसह्य व्हावं. संस्कारित पिढी तयार व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com