Kalyan News
kalyan politicalSaam tv

ऐन निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; शिंदे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीला नवं वळण, नेमकं काय घडलं?

kalyan political News : ऐन निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. शिंदे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीला नवं वळण लागलं आहे.
Published on
Summary

निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

आरोपींना अटक न झाल्याने भाजप आक्रमक झालीये

भाजपकडून सुनीलनगर येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं

परिसरात तणावपूर्ण वातावरण झालंय

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीतील शिवसेना–भाजप हाणामारी प्रकरणाला नवे वळण लागलं आहे. आरोपींना अद्याप अटक न झाल्याने भाजप आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर परिसरात भाजपच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.

Kalyan News
टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

या मूक मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह २९ प्रभागांतील सर्व भाजप उमेदवार व मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांनी हातावर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवत, मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली.

Kalyan News
इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू; राज ठाकरेंचा महायुतीवर घणाघात

यावेळी बोलताना नंदू परब यांनी आरोप केला की, प्रकरणात गुन्हे दाखल झाले असतानाही आरोपी मोकाट फिरत आहेत. हा प्रकार म्हणजे सरळसरळ गुंडगिरीला पाठीशी घालण्याचा आहे. डोंबिवलीत वाढलेली दहशत तात्काळ थांबवली पाहिजे.भाजप उमेदवारांनीही आरोप केला की, सध्या दहशतीच्या वातावरणात निवडणूक प्रचार करावा लागत असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

Kalyan News
निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

तत्पूर्वी, या हाणामारी प्रकरणात दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शिवसेना उमेदवारांविरोधात जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संभाव्य तणाव लक्षात घेता, सुनीलनगर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com