Team India
Team India saam tv

टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झालाय.
Published on
Summary

टीम इंडियाला मोठा धक्का

संघातील स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झालाय

IND vs NZ : टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. सरावादरम्यान टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. दुखापतग्रस्त झाल्याने या स्टार खेळाडूला मैदानाबाहेर जावं लागलं आहे. चांगल्या खेळाडूला दुखापतग्रस्त झाल्याने शुभमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वाढलं आहे. तिलक वर्मा देखील दुखापतग्रस्त झाला होता. टीम इंडियाचा दुसरा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. दुखापतग्रस्त झाल्याने त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आलं. संघाच्या ११ खेळाडूंमध्ये ऋषभ पंतला स्थान मिळालं नाही, तर संघात विकेटकिपर म्हणून केएल राहुलला संघाची पहिली पसंती असेल. सध्या पंतचा बॅकअप प्लान म्हणून राहुल संघात आहे.

Team India
अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

पंतने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी होती. पंत बरा होऊन संघात स्थान मिळावे, अशी भावना चाहते व्यक्त करत आहेत. टीम इंडियाच्या वनडे सामन्यासाठीच्या प्लेइंग ११ वर सर्वांची नजर राहणार आहे. सलामीवीर कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या जोडीवर सर्वांची लक्ष असणार आहे. तर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली खेळताना दिसेल. तर उपकर्णधार श्रेयस अय्यर खेळताना दिसेल.

Team India
लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत? महत्वाची अपडेट समोर

विकेटकिपर फलंदाज म्हणून केएल राहुलचं स्थान देखील निश्चित मानलं जात आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डीपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर संघात सातव्या स्थानावर रवींद्र जडेजाचं स्थान पक्के मानले जात आहे. गोलंदाजांमध्ये फारसा बदल पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com