Jalgaon car accident  Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Jalgaon latest News :जळगावमध्ये शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. जळगावच्या चोपडावरून भुसावळकडे जाताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

संजय महाजन, साम टीव्ही प्रतिनिधी

जळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे सर्व प्रमुख राजकीय नेत्यांचे देशासहित राज्यभरात प्रचार दौरे सुरु आहेत. यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांच्या वाहनांचे ताफे सभास्थळी पोहोचत आहेत. याच प्रकारच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. शरद पवार यांचा हा ताफा होता. जळगावमध्ये शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. जळगावच्या चोपडावरून भुसावळकडे जाताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आज शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यातील सर्व मंडळी हे चोपडावरून भुसावळकडे चालले होते. शरद पवार यांचा ताफा यावल तालुक्यातील किनगाव जवळ पोहोचला.

त्यावेळी शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यातील कार दुसऱ्या वाहनाला धडकली. ताफ्यात शरद पवार यांच्या गाडीमागे असलेल्या ताफ्यातील दोन वाहने धडकले. या अपघातात कुणालाही दुखापत झालेले नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेमकं काय घडलं?

शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी चोपडा येथे सभा झाली. त्यानंतर त्यांचा ताफा भुसावळकडे रवाना झाला. भुसावळकडे जात असताना यावलजवळ गतीरोधक आला. त्यामुळे शरद पवार यांच्या कारचा वेग कमी झाला. त्यानंतर त्यांच्या कारच्या मागील काही वाहन चालकांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर त्यांची वाहने एकमेकांवर धडकल्या. यामध्ये दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

SCROLL FOR NEXT