Akola Accident: आमदाराच्या भावाच्या कारला अकोल्यात भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू; दोन्ही कारचा चुराडा

MLA Kiran Sarnaik Brother Car Accident: अकोला जिल्ह्यातल्या पातुर शहराजवळ हा अपघात झालाय. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Akola Car Accident
Akola Car AccidentSaam Tv

अकोल्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झालाय. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

Akola Car Accident
Narendra Patil : मराठी माणसांवर हल्ले करणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले, हे दुर्भाग्य : नरेंद्र पाटील

या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये काही जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत. अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

Akola Car Accident
CM Shinde: पीएम मोदींप्रमाणे मी ही सुट्टी न घेता काम करतोय: मुख्यमंत्री शिंदे

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये रघुवीर अरुण सरनाईक ( २८ वर्षे), अस्मिता अजिंक्य आमले ( 9 महिने), शिवानी अजिंक्य आमले (30 वर्षे), सिद्धार्थ यशवंत इंगळे (३५ वर्षे), अमोल शंकर ठाकरे ( ३५ वर्षे) आणि कपिल प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये पियुष देशमुख (११ वर्षे), सपना देशमुख (४१ वर्षे) आणि श्रेयस सिद्धार्थ इंगळे (३७ वर्षे) हे गंभीर जखमी आहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पातूर पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com