Narendra Patil : मराठी माणसांवर हल्ले करणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले, हे दुर्भाग्य : नरेंद्र पाटील

सामान्य रिक्षा चालक असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना गर्वाने मुख्यमंत्री केल्याचं नरेंद्र मोदी हे सांगतात. त्याच आनंद बाळासाहेब ठाकरे यांनाही झाला असता असेही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं.
narendra patil criticises nana patole and uddhav thackeray
narendra patil criticises nana patole and uddhav thackeraySaam Digital

Narendra Patil News :

ज्या मराठी माणसांवर काँग्रेसने सातत्याने हल्ले केले. त्याच काॅंग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले. मराठी माणसांच्या जीवावर उभी राहिलेल्या संघटनेच्या मुळावरच उद्धव उठल्याची टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे, धाेरणात्मक निर्णय नाना पटोले यांना दिसत नसेल तर त्यांना चष्मा आणि पीए बदलण्याची वेळ आली आहे असेही नरेंद्र पाटील यांनी नमूद केले. ते साेलापूर येथे माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

नरेंद्र पाटील म्हणाले राज्यातील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार पंतप्रधान मोदी हे करत आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यातही प्रचार केला आणि दुसऱ्या टप्प्यातही प्रचार करताहेत. पंतप्रधान मोदी हे घाबरून प्रचार करत नाही. त्यांनी केलेल्या कामाचा ते प्रचार करतातहेत.

narendra patil criticises nana patole and uddhav thackeray
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

ज्या मराठी माणसांवर काँग्रेसने सातत्याने हल्ले केले. त्याच मराठी माणसांच्या जीवावर शिवसेना उभी राहिली. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते काँग्रेस सोबत गेलो तर माझी दुकानदारी बंद करेल. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मॅडमला भेटतात आणि युती करतात हे दूरभाग्य असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामान्य रिक्षा चालक असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना गर्वाने मुख्यमंत्री केल्याचं नरेंद्र मोदी हे सांगतात. त्याच आनंद बाळासाहेब ठाकरे यांनाही झाला असता असेही त्यांनी म्हटलं.

आमचा नेता किती मोठा आहे हे महाराष्ट्र पाहताेय : नरेंद्र पाटील

दरम्यान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना कधी उद्धव ठाकरेंना ऐकले आहे का? उद्धव ठाकरे यांनी राजकारणात नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करावी. परंतु दुर्देवाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे व्यक्तिगत टीका करताहेत. त्यामुळे आमचा नेता किती मोठा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळते असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

narendra patil criticises nana patole and uddhav thackeray
Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com