Sharad Pawar addresses media after taking oath as Rajya Sabha MP, clarifying stance on NCP merger talks. Saam Tv
महाराष्ट्र

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर शरद पवार यांचं मोठं विधान

NCP Merger Talks Revealed: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनाबाबत चर्चा रंगली होती. राज्यसभा शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी यावर मोठे विधान करत सध्याची स्थिती स्पष्ट केली.

Omkar Sonawane

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनि‍करणाची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षात यामुळे राजकीय रणकंदन देखील पाहायला मिळाले. त्यामुळे विलीनि‍करणाची चर्चा झाली होती की नाही यावर अद्याप खुलासा झालेला नाही. दरम्यान आता यावर शरद पवार यांनीच मौन सोडले आहे.

राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले राजकारणात लोकांचे काम करण्यासाठी यावे लागते. अजित पवार हे लोकांचे काम करण्यासाठी सक्रिय होते. अजित पवारांबद्दल नागरिकांमध्ये आदर होता. दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. कुटुंब म्हणून आम्हाला त्यांचे दु:ख आहे. पवार कुटुंबावर संकट आलेले आहे. मी कुटुंबप्रमुख असल्याने माझ्यावर जबाबदारी आहे.

विलीनि‍करणाबाबत अजित पवार-जयंत पाटील यांच्यात बैठका

विलीनि‍करणाबाबत शरद पवार म्हणाले, जयंत पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादी विलीनि‍करणावर चर्चा करत होते. दोघांमध्ये पाच ते सहा बैठका झाल्या होत्या. बैठक झाल्यानंतर दोघांपैकी एकजण येऊन मला ब्रिफिंग करत होते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर ही चर्चा थांबली. आता आमच्या पक्षात याविषयी चर्चा नाही. तसेच भविष्यात ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते की नाही हे आज सांगता येणार नाही. अजित पवार यांचा दृष्टिकोन आम्हाला समाधान देणारा होता. परंतु ते गेल्यामुळे ही चर्चा खंडित झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

7 वर्षांपासून सुरू NEET पेपर चोरी? मोटेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर?

खेळता-खेळता लिफ्टमध्ये गेला अन् दोन मजल्यांमध्ये अडकला; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

भारतात आर्थिक संकटाचं वादळ येणार? इंधन दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा

राज्याच्या प्रशासनात 'बदली' वारे! तुकाराम मुंढेंसह 6 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT