Ajit Pawar Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Pawar Family: इकडे ठाकरेंच्या युतीची चर्चा, तिकडे पवार काका-पुतण्यांमध्ये भेट, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?

Ajit Pawar and Sharad Pawars Meeting Sparks Speculation: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली साद आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतानाच, आता आणखी महत्वाची बैठक पवार कुटुंबात पार पडली.

Bhagyashree Kamble

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली साद आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच आज आणखी महत्वाची बैठक पवार कुटुंबात पार पडली. यामुळे ठाकरे बंधू युतीच्या चर्चेनंतर आता काका पुतण्या एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांसोबत इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठकही झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा रंगली? याचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय.

इतरांनी चर्चा करणे योग्य नाही

पवार कुटुंबातील साखरपुडा कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावर अजित पवार म्हणाले, 'साखरपुडा कार्यक्रम हा पुर्णत: पवार कुटुंबाचा वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय आहे. इतरांनी त्यावर चर्चा करणे योग्य नाही. हा कुटुंबाचा अंतर्गत विषय आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. पवार विविध संस्थात्मक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतात. त्यामागील उद्देश नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती असतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसणे गरजेचं

'आज पार पडलेली बैठक देखील महत्वाची होती. ज्यामध्ये कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा कसा प्रभावी वापर करता येईल, यावर सखोल चर्चा झाली. शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, असा ठाम विचार या बैठकीतून समोर' आल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. तसेच अशावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसणे गरजेचं असतं, असंही पवार म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद

राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबुती निश्चितपणाने येईल,असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

SCROLL FOR NEXT