Shambhuraj Desai News : शिंदे-फडणवीस व सरकारमध्ये वाद लावण्यासाठी वक्तव्य केली जात आहेत. परंतु कितीही प्रयत्न केले तरी तसेच दररोज अशी कितीही वक्तव्य झाली तरी शिंदे फडणवीस सरकारवर त्याचा तिळ मात्र ही परिणाम होणार नाही असे ठाम मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण येथे व्यक्त केले. दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांचा फाेन सुरु असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे माझ्याकडे आले त्यावेळी मी नव्हे तर उदयनराजेंनी फाेन कट केल्याची माहिती मंत्री देसाईंनी दिली. (satara latest marathi news)
मंत्री शंभूराज देसाई यांनी आज (शनिवार) पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे पत्रकारांशी संवाद साधताना विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar), धनंजय मुंडे, चंद्रकांत खैरे आदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. (Breaking Marathi News)
राष्ट्रवादीचे (ncp) नेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस मुख्यमंत्री असते तर प्रकल्प गुजरातला गेले असते का, शिंदे सरकार असल्याने असं घडल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यावर मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) म्हणाले मुंडे यांच्या बाेलण्याला काही अर्थ नाही. त्यांच्या सरकारच्या काळात हे प्रकल्प बाहेर गेले आहेत. माहितीच्या अधिकारात देखील उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या कार्यकाळात हे सगळं घडले आहे. हाय पाॅवर समिती, कॅबिनेटच्या बैठका झाल्या नाहीत हे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra News)
चंद्रकांत खैरे प्रवाहाच्या बाहेर
काेणी कितीही प्रयत्न केले तरी आमच्या सरकारवर याचा परिणाम हाेणार नाही असेही मंत्री देसाईंनी नमूद केले. मंत्री देसाई म्हणाले चंद्रकांत खैरे प्रवाहाच्या बाहेर आहेत. ते देखील भडक वक्तव्य करून आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करत आहेत. अपात्रतेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल. त्यामुळे पुढचा प्रश्न येणार नाही असे मंत्री देसाईंनी स्पष्ट केले. (Shambhuraj Desai Marathi News)
तिकडून फाेन कट झाला : शंभूराज देसाई
दरम्यान शुक्रवारी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले हे माझी वेळ घेऊन निवासस्थानी आले. त्याच काळात राजे येण्यापुर्वी उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांचे कार्यकर्ते सुनील काटकर यांनी उदयनराजेंना फाेन लावून दिला. माझं बाेलणं सुरु हाेते. त्याच वेळी मी शिवेंद्रसिंहराजेंचे स्वागत केले आणि उदयनराजेंना म्हटलं एकाबाजूला थाेरल्या राजांचा फाेन सुरु आहे आणि धाकटे राजे मला भेटायला आले आहेत असे मी म्हटलं तेवढ्यात तिकडून फाेन कट झाला, मी फाेन कट केला नाही असे देसाईंनी नमूद केेले.
मंत्री देसाई म्हणाले शिवेंद्रसिंहराजे आणि आमची ब-याच वेळ चर्चा झाली. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे (shivendraraje bhosale) निघून गेले. त्यानंतर अर्धा तासांनी मला उदयनराजेंचा फाेन आला. त्यांच्यासमवेत देखील चर्चा झाल्याचे देसाईंनी सांगितले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.