Shambhuraj Desai News : हे सहन केले जाणार नाही; शंभूराज देसाईंनी अजित पवारांना सुनावलं

आज पाटण येथे मंत्री देसाईंनी अजित पवार यांच्यावर टीकासत्र साेडले.
Shambhuraj Desai , Ajit Pawar
Shambhuraj Desai , Ajit Pawarsaam tv
Published On

Shambhuraj Desai News : दरडप्रवण आणि भूस्खलनप्रवण गावांतील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबतचे धोरण राज्य सरकारने आणले आहे. हे धोरण येण्याआधी कोयनानगरमध्ये मोठे भूस्खलन झाले. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र मदत पॅकेज दिले. त्यांना नवीन जागेत गावठाण वसवण्यासाठी, घरे बांधण्यासाठी जागा खरेदी करण्याकरिता शासनाने आर्थिक मदत दिली आहे. तसेच अशी सुमारे 600 घरे एमएमआरडीए आणि सिडकोकडून बांधून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले अशी माहिती पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. (Shambhuraj Desai Latest Marathi News)

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (शनिवार) लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री देसाई यांनी विराेधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका केली.

Shambhuraj Desai , Ajit Pawar
Political News : एनसीपी, भाजप एकवटली; काँग्रेस नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

शंभुराज देसाई म्हणाले अजित पवारांनी (ajit pawar) अठ्ठेचाळीस तासाचं सरकार केलं ती बेईमानी नव्हती का? पहाटे शपथ घेताना शरद पवारांना विचारलं होत का ? असा सवाल करीत देसाईंनी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना बेईमान म्हटल्याबाबत माध्यमांशी बाेलताना हे प्रश्न केले.

Shambhuraj Desai , Ajit Pawar
Narayan Rane News : अजित पवारांच्या थापा मी ऐकल्या, काय म्हणाले नारायण राणे (पाहा व्हिडिओ)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या वरील टीका सहन केली जाणार नाही. राष्ट्रवादी कॉग्रेस - भाजपा एकत्र येणार होती याबाबत अधिक माहिती गुलाबराव पाटील यांच्याकडे असेल. त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल असेही एका प्रश्नावर देसाईंनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Shambhuraj Desai , Ajit Pawar
Satara News : किस्साच झाला ! शिवेंद्रराजे पाेहचताच उदयनराजेंचा फोन कट, मंत्री देसाई लागले हसू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com