Shaktipeeth Mahamarg Saam Tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg: ४ तालुके, ३४ गावं, सोलापूरातील या ठिकाणाहून जाणार शक्तीपीठ महामार्ग; जमिनीच्या किंमती रातोरात दुप्पट

Shaktipeeth Expressway Solapur Route Villages List: शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहे. सोलापूरातील माढा, माळशिरस, बार्शी आणि पंढरपुरातून जाणार आहे. ३४ गावातून हा महामार्ग जाणार आहे.

Siddhi Hande

शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट

सोलापूरातील या ४ जिल्ह्यांमधून जाणार

एकूण ३४ गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार

गावातील जमिनींच्या मागण्या वाढल्या

राज्यातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गापैकी एक शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. महामार्ग १३ जिल्ह्यातून जाणार असून यामध्ये साताऱ्याचा समावेश झाला आहे.आता हा मार्ग बदलल्यानंतर बार्शी, माढा, पंढरपुर आणि मालशिरस तालुक्यातीन साताऱ्याकडे जाणार आहे.

जमिनी खरेदीची मागणी वाढली

या महत्त्वाच्या बदलामुळे या भागातील जमिनींना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतजमिनींच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली आहे. या ठिकाणी जमीन खरेदीसाठी अनेकजणांची इच्छा आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जमीन विकण्यास नकार दिला आहे.

शक्तीपीठ महामार्ग ज्या गावांमधून जाणार आहे. ज्या जमीनी शक्तीपीठ महामार्गातून जाणार आहे, त्या परिसरातील जमिनींना जास्त मोबदला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जमिनी खरेदी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहे.

या गावांमधून जाणार शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Mahamarg Route Solapur District 34 Villages)

सोलापूर जिल्ह्यातील एकूण ३४ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यात बार्शी, माढा, पंढरपुर आणि मालशिरस तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

बार्शी तालुक्यातील मेडशिंगी, रुईवर, वहऱ्हाडी, बेगडा, सुरडी, गौडगाव, नरेगाव, रुई, मालेगाव, मुंगशी, रातंजन, सर्जापूर, वैराग, मुक्ताई वॉटर पार्क, ढोराळे, सावळी, धानोरे या गावातून शक्तीपीठ महामार्ग जणार आहे.

माढ्यातील मानेगाव, चव्हाणवाडी, वाकाव, केवळ, खैरेवाडी, विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक, रोपळे, वडाचीवाडी, सोलंकरवाडी, बावी, मोडनिंब, अरण, तुळशी या गावांचा समावेश आहे.

पंढरपुरातील करकंब व्यवहारे वस्ती, नेमतवाडी, बादलकोट, पेहे, आवे, नांदोरे, भीमा नदीवर पूल या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.

माळशिरमधील नेवरे, जांभूड, विठ्ठलवाडी, माळखांबी, उघडेवाडी, वेळापूर, मजरेवाडी, घुमेरा ओढ्यावरील पूल, निमगाव, गारवाड, चांदापुरी या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT