सोलापुरात पतीने पत्नीला जाळल्याची घटना
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
पतीसह ८ जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीला अटक केली
सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. एका महिलेला पैसे आणि दागिन्यांसाठी मानसिक छळ करून जिवंत जाळल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणातील महिला नर्गिस फैजान शेख ही गंभीररीत्या भाजली होती. रुग्णलयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या नर्गिसचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पतीसह आठ जणांच्या विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र नर्गिसच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, नर्गीस आणि आरोपी फैजल यांचा आठ महिन्यापूर्वी विवाह झाला. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नर्गीसचा लग्नानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांतच पती व सासरच्या मंडळींकडून किरकोळ कारणांवरून छळ करण्यात आला. नर्गीसची सासरकडची मंडळी आणि तिचा नवरा पैसे आणि दागिन्यांसाठी तिला मारायचे.
या त्रासाला कंटाळून ती माहेरी गेली. १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजता पती फैजान तिच्या माहेरी आला. “एकांतात बोलायचे आहे” असे सांगून त्याने नर्गिसला खोलीत नेले आणि आतून दरवाजा बंद केला. नवऱ्याच्या प्रेमात असलेल्या नर्गिसने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि ती फसली. खोलीत जाताच नर्गिसच्या पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून लायटरने आग लावल्याची गंभीर घटना घडली.
आगीच्या ज्वाळांमध्ये नर्गिस तडफडत होती. मात्र तिच्या निर्दयी पतीला जरासुद्धा दया आली नाही. या दुर्घटनेत नर्गिस गंभीर भाजली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णलयात दाखल केलं. मात्र गेल्या सहा दिवसापासून मृत्यूची झुंज देणाऱ्या नर्गिस हिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी फैजानला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.