Shaktipeeth Expressway Statewide Farmer Protest PTI
महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway Protest : एक दिवस, १२ जिल्हे अन् एकीचं बळ...; शक्तीपीठ महामार्गाविरोधात २४ जानेवारीला शेतकरी वज्रमूठ आवळणार!

Shaktipeeth Expressway Farmers Protest : शेतकरी संघर्ष समितीने शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. २४ जानेवारी रोजी एकाच वेळी १२ जिल्ह्यात शेतकरी आंदोलन करणार आहेत.

Yash Shirke

Shaktipeeth Expressway Statewide Protest : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाच्या नियोजनाची सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. शेतकऱ्यांकडून झालेल्या विरोधामुळे महामार्गाच्या कामाला विलंब झाला होता. तेव्हा पुन्हा नव्याला कामाला सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अशातच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग होईल पण कोल्हापुरातून जाणार नाही असे विधान केले होते. या विधानावरुन महामार्गाला कोल्हापुरात विरोध होत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता शेतकरी संघर्ष समितीने शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. समितीने महामार्ग विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.

शेतकरी संघर्ष समितीची ऑनलाइन बैठक बोलवण्यात आली होती. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातील बैठकीत समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. समितीद्वारे २४ जानेवारी रोजी एकाच वेळी १२ जिल्ह्यात आंदोलन होणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. फक्त एका जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असा खोटा प्रचार सरकारकडून होत आहे, अशा सरकारची पोलखोल करणार असे समितीने म्हटले आहे. बारा जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.

समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेड माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग ८०२ किमी लांब आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यास सुरुवात झाली होती. भूसंपादनाच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला होता. आता पुन्हा शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री फडणवीस प्रकल्पाविषयी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

SCROLL FOR NEXT