Mumbai Nashik Highway Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Nashik Highway : मुंबई- नाशिक महामार्ग बंद; वादळी वाऱ्याच्या तडाख्याने वाहतूक खोळंबली, रेल्वे वाहतूकही विस्कळीत

Shahapur News : राज्यभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख  

शहापूर : राज्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा बसत आहे. यातच आज दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई- नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद झाली आहे. तसेच मुंबई- कसारा रेल्वेवर पत्री शेडचा पत्रा येऊन पडल्याने तानशेत स्टेशनजवळ रेल्वे उभी आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

राज्यभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. सध्या उकाड्याने हैराण झाले असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. यातच दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे.

दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली 
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मुंबई- नाशिक महामार्गावर विद्युत लाईनच्या वायरी तुटून महामार्गावर पडल्या आहेत. शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील रातांधळे गावाजवळ या वायरी तुटून महामार्गावर पडल्याने दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. परिणामी मुंबईहून नाशिक व नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

रेल्वेवर उडाली पत्रे 

शहापूर तालुक्यात सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून अनेक भागात गारपीट देखील झाली आहे. यातच मध्ये रेल्वेच्या ट्रेनला देखील याचा फटका बसला आहे. मुंबई- कसारा ट्रेन जात असताना पत्री शेडवरील पत्रा वाऱ्यामुळे उडून ट्रेनवर येऊन पडले आहे. यामुळे सदरची ट्रेन तानशेत स्टेशनजवळ उभी आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT