फैय्याज शेख
शहापूर : लोकनियुक्त अर्थात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव आणून तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अविश्वास ठराव करण्यात संख्याबळ अधिक राहिल्याने ठराव मंजूर करण्यात आला आहे. अशा पद्धतीने लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठरावाचा निर्णय महाराष्ट्रातील ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मढ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आजचा हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच गिता गुरूनाथ जाधव यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर थेट अविश्वास ठराव आणता येत नसतो. हा अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी खास ग्रामसभा बोलावून त्यात ठराव मांडून अंतिम निर्माण घ्यावा लागत असतो.
बोलाविण्यात आली खास ग्रामसभा
दरम्यान शासनाच्या नवीन राजपत्राप्रमाणे ग्रामसभेत जनतेच्या समोर ठराव घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार काल मढ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली खास ग्रामसभा घेण्यात आली. सदरची ग्रामसभा खुल्या शाळेच्या आवारात घेण्यात आली होती. यात एकूण ५३६ मतदार उपस्थित होते. या मतदारांद्वारे अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यात आले.
५३६ मतदारांमार्फत निर्णय
ग्रामसभेत या मतदारांना ज्यांना सरपंच नको आहे, ते एका बाजूला जा व ज्यांना सरपंच पाहीजे त्यांनी एका बाजूला जा; अशी सुचना तहसीलदार कसुळे यांनी दिली. यामुळे काही काळ गोंधळाचा वातावरण निर्माण झाले होते. मात्र तहसीलदारांच्या सुचनेनुसार दोन भाग विभागले गेले. यात एका बाजूला २५५ तर दुसऱ्या बाजूला ३०३ मतदार झाल्याने सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.