Pune Crime : इथे फक्त बॉस, बाकी सगळे..; गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल

Pune News : निलेश घायवळ याच्या नावाने असलेल्या अकाउंट वरून टोळीतील गुन्हेगारीचे उद्दतीकरण होत असलेले व्हिडिओ अपलोड केले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची तात्काळ दखल घेतली
Pune Crime
Pune CrimeSaam tv
Published On

अक्षय बडवे 

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी फरार निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांवर सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजात दहशत निर्माण होईल; अशा रील्स अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे शहरातील कोथरूड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात निलेश घायवळ हा फरार झाला होता. दरम्यान घायवळ याने सोशल मीडियावरून काही रिल्स अपलोड केल्या आहेत. ज्यात सोशल मिडियावर निलेश घायवळ याच्या नावाने असलेल्या अकाउंट वरून त्याने आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनी गुन्हेगारीचे उद्दतीकरण होत असलेले व्हिडिओ अपलोड केले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची तात्काळ दखल घेतली. 

Pune Crime
Alibag News : बनावट नोटा प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू; मुंबईतील जेजे रुग्णालयात सुरू होते उपचार

दहशत निर्माण करणाऱ्या रिल्स 

सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवळ याच्यासमवेत त्याच्या साथीदारांवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Instagram आणि facebook अकाउंट वर भीतीदायक रिल्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी सदरचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आणखीन तपास करत आहेत. 

Pune Crime
Akola : गोमांस विक्रीच्या दुकानावर धाड; दोन गट आमने- सामने, अकोल्यात तणावाचे वातावरण

घायवळच्या ताबा घेतलेल्या १० सदनिका सील करण्याचे आदेश
दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमधील १० सदनिकावर घायवळने बेकायदेशीर ताबा मारला होता. या सदनिका भाड्याने देऊन त्यातून पैसे कमवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या सदनिका खाली करून सील करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. हि कारवाई केली जाणार आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com