Shahapur Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Heavy Rain : रात्रभर मुसळधार पावसाने कानवे नदीला पूर; चरिव गावातील मंदिर पाण्याखाली, नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार पाऊस 

Shahapur News : पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडले की या नदीला पूर येतो अतिदुर्गम भागात डोंगराल भागाच्या मध्ये वसलेले हे गाव पावसाळ्यात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे लोंढे कानवे नदीत मिसळतात

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: शहापूर तालुक्यातील अनेक भागात काळ रात्रभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नद्यांना पूर आला असून प्रतीपंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या चरीव गावाच्या जवळ असलेल्या कानवे नदीला देखील पुर आला आहे. या पुरामुळे नदीकाठी असलेले तीनही मंदिर पाण्याखाली आले आहे. 

पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला की या नदीला पूर येतो अतिदुर्गम भागात डोंगराल भागाच्या मध्ये वसलेले हे गाव पावसाळ्यात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे लोंढे कानवे नदीत मिसळतात. यामुळे या नदीला पूर येत असतो. या पुराच्या पाण्यात मंदिर पुर्णपणे बुडते. काही वेळा नदी काठी असलेल्या घरांमध्ये देखील पुराचे पाणी शिरते. पाऊस पडायचे थांबले कि नदीचे पाणी देखील ओसरत असते. 

पहिल्याच पावसात मंदिर पाण्याखाली 

चरिव गावात ऐकून तीन मंदिर असून हे मंदिर कानवे नदी आहेत. यामुळे दरवर्षी नदीला पूर आला कि हे तीनही मंदिर पाण्याखाली जातात. कानवे नदीत काठी महादेव, भक्त पुंडलिक आणि मंदिर विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. 

नंदुरबारमध्येही मुसळधार पाऊस 
नंदुरबार जिल्ह्यात देखील काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले आहेत. तर मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरालगत असलेल्या पातळगंगा नदीला देखील पूर आला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आला असून चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT