Amravati: तीन बाळांचा जन्मानंतर मृत्यू, अंत्यसंस्काराच्यावेळी हालचाल; डॉक्टरांवर गंभीर आरोप

Amraati Shocking News: अमरावतीत मृत घोषित केलेल्या बाळाने अंत्यसंस्कारावेळी हालचाल केल्याचा धक्कादायक प्रकार. नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले.
Amravati
Emotions ran high as a baby declared dead showed movement during final rites in Amravati—hospital now under scrutiny.Saam TV News
Published On

अमरावतीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी बाळाची हालचाल सुरू होती. बाळाला परत रूग्णालयात आणण्यात आलं. आसीयुमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, बाळाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रूग्णालयात काल एका महिलेची प्रसूती झाली होती. या महिलेनं तीन बाळांना जन्म दिला. मात्र तिन्ही बाळांचा थोड्या वेळानंतर मृत्यू झाला. यानंतर मृत बाळांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं. अंत्यसंस्काराच्या वेळी एका बाळाची हालचाल सुरू असल्याचा भास नातेवाईकांना झाला.

Amravati
Shocking Crime: चारित्र्यावर संशय अन् गुप्तांगात मिरचीची पूड, इस्त्रीचे चटकेही.. नवऱ्याकडून बायकोचा अमानुष छळ

नातेवाईकांनी तातडीने बाळांना घेऊन जिल्हा स्त्री रुग्णालयात धाव घेतली. आयसीयुमध्ये बाळांना दाखल केलं. मात्र, बाळांचा मृत्यू झाला. तिन्ही बाळ जिवंत होते. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बाळांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला.

Amravati
Crime: बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "ही प्रसूती नव्हे, तर २० आठवड्यात झालेलं अबॉर्शन होतं. बाळांचं वजन केवळ ३०० ग्रॅम होतं. तिन्ही बाळं जन्मत:च मृत होती. नातेवाईकांनी परत आणलेलं बाळही तपासल्यानंतर मृत आढळलं", अशी माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी देखील महिलेचे वर्षभरापूर्वी वीस आठवड्यातच अबोर्शन झाले असल्याची माहिती देखील विनोद पवार यांनी दिली. याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

कसारा खोडाला मोखाडा रस्ता बंद

सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून, काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रस्ते बंद झाले आहेत. मोखाडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कसारा - खोडाला - मोखाडा रस्त्यावरील गारगाई नदिवरी पुलावर पावसाचे पाणी साचल्याने रस्ते बंद झाले आहेत. या पुलावर किमान दोन ते तीन फुट पाणी साचल्याने ये जा करणारी वाहाने थांबली असून, पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com