sharad pawar ncp  Saam tv
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका; तातडीने खासगी रुग्णालयात दाखल

sharad pawar ncp News :ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. या नेत्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Saam Tv

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

त्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात केलं दाखल

रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली

अक्षय गवळी, साम टीव्ही

राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री तथा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाबराव गावंडे यांच्या आरोग्याबाबत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होतंय. त्यानंतर त्यांना तातडीने अकोल्यातल्या खाजगी आयकॉन रुग्णालयात करण्यात दाखल आलंय. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्याचा सल्ला दिलाय. पुढं नागपूरच्या अर्नेजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. आज त्यांच्यावर 3 तास शस्त्रक्रिया चालली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी कळवलंय. त्यांच्या हृदयात अर्थातच हार्टमध्ये 2 ब्लॉकेज असून त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून ब्लॉकेज काढण्यात आले.

नेमके कोण आहेत गुलाबराव गावंडे? 

अकोला शहरातील कौलखेड भागात राहणारे गुलाबराव गावंडे. वादळी नेता अशी त्यांची ओळख आहे. ते शरद पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेयेत. गुलाबरावांचा विदर्भात शिवसेना मोठी करायला मोठा सिंहाचा वाटा आहे. युती सरकारच्या मनोहर जोशी मंत्रीमंडळात गावंडे तब्बल 4 वर्ष विविध खात्यांचे राज्यमंत्री राहिले आहेयेत.

गुलाबराव तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून 3 वेळा विधानसभेवर निवडून आले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून 1990 मध्ये, त्यानंतर 1995 मध्ये अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू अर्थातच आताचा अकोला पुर्व मतदारसंघ, आणि 2004 मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून आमदार झाले आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत बोलू दिलं जात नसल्यामुळे सभागृहात अंगावर रॉकेल घेतल्यानं त्यावेळी ते चर्चेत आले होते.

2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. गुलाबराव गावंडे यांनी धनुष्यबाण सोडून हातात घड्याळ बांधलेय. त्याशिवाय गुलाबराव गावंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांचे वडील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT