महाराष्ट्र

Hidayat Patel Murder Case: काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची मशिदीबाहेरच हत्या, आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसच्या २ नेत्यांवरही गुन्हा

Hidayat Patel murder case Akola update : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत. अकोला जिल्ह्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Akola Congress vice president killed outside mosque : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे.

अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर खुनाचे प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर आता खुनाचे गुन्हे दाखल होतात का? याकडे लक्ष लागलेय. पटेल कुटुंबियांच्या तरकारीवरून हे गुन्हे दाखल केले आहेत. आता हिदायत पटेलांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात खुनाची कलमं वाढणार का?, याकडे लक्ष लागून आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव-

हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडखे, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची आरोपींमध्ये नाव आहे.. तर फाजील आसिफ खां आणि फारूख आसिफ खां अन्य लोकांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय हल्लेखोर आरोपी उबेद पटेलवर देखील गुन्हा दाखल आहे. हे गुन्हे अकोट ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदवण्यात आलेय.

नेमकं काय होतं प्रकरण?

काल अकोट तालूक्यातील मोहाळा गावात हिदायत पटेल यांच्यावर उबेद पटेल या तरुणाने हल्ल्या केल्यानंतर आज सकाळी पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्लेखोर आरोपी उबेद पटेला रात्री अकोट तालुक्यातल्या पणज गावातून केली अटकं केलीय. गुन्ह्यात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे असल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.हल्ला आणि कट रचल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता खुनाचा गुन्हा किती लोकांवर दाखल होतो?, याकडे लक्ष आहे..

नेमकं तक्रारीत काय आहे नमूद?

हकिकत अशा प्रकारे आहे की, फिर्यादी यांना त्यांचे मोठे बाबा हिदायत उल्ला खा पटेल हे रक्तबंबाळ अवस्थेत येतांना दिसले, फिर्यादींनी त्यांना किसने मारा असे विचारले असता, त्यांनी गावातील उबेद पटेल राजीक उर्फ कालु पटेल याने ते मस्जीद मध्ये बसलेले असतांना मागून येवून जिवाने मारण्याच्या उददेशाने अचानक त्यांचे गालावर, पोटावर, पाठीवर, छातीवर व गुप्तांगाच्या जवळ चाकुने जीवघेणा हल्ला केल्याचे सांगीतले. त्यांनतर फिर्यादी, अथर पटेल व इस्ताक पटेल यांनी जख्मी हिदायतउल्ला खा पटेल यांना अकोट येथील हॉस्पीटल येथे नेण्यात आलं. तेथे फिर्यादींना त्याचे जखमी मोठे बाबा यांनी सांगीतले की, त्यांनी उबेद पटेल राजीक उर्फ कालु पटेल यास विचारले असता, त्याने फिर्यादींचे मोठे बाबा यांना म्हटले की, तुमको मारने के लिये मेरे को अकोट के बद्रुजम्मा मोहम्मद आदील, राजु विठठलराव बोचे, संजय रामदास बोडखे, इन्होने मारनेका बोला था! ऐसा बताया. आणि फाजील आसीफ खॉ और फारुख आसीफ खाँ यांनी उबेद पटेल यास सोडवून घेवू असे सांगीतले. अशा फिर्यार्दीच्या जबानी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT