Ashok Kharat Saam Tv
महाराष्ट्र

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला धड चालताही येईना, म्हणतो 'ताकद नाही राहिली', पोलिसांसमोर ढसाढसा रडला, VIDEO आला समोर

Ashok Kharat New Video: महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरातचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दैवी ताकदीचा दावा करणाऱ्या खरातची अशी अवस्थात झाली की त्याला धड चालतानाही येत नाहीये.

Priya More

Summary -

  • भोंदूबाबा अशोक खरातचा नवा व्हिडीओ समोर

  • पोलिस चौकशीत खरात ढसाढसा रडला

  • अटकेनंतर खरात म्हणतो ताकद राहिली नाही

  • एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून त्याची कसून चौकशी

ज्योतिष असल्याचे सांगत शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अशोक खरातची सध्या नाशिक पोलिस आणि एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. अशोक खरातच्या काळ्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दैवी ताकदीचा दावा करणाऱ्या अशोक खरात म्हणतो की आता माझ्यात ताकद राहिली नाही. अटकेनंतर त्याचे असे हाल झाले आहे की धड त्याला चालताही येईना. अशोक खरातची नाशिक पोलिसांनी वरात काढत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे त्याला बोलण्यास भाग पाडले.

अशोक खरात यांची एसआयटीने तब्बल सात तास चौकशी केली. त्यानंतर त्याला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट- १ च्या ताब्यात दिले. तिथेही पोलिसांनी अशोक खरातला खाकी वर्दी दाखवली. यावेळी त्याला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे बोलायला सांगितले. नाशिक पोलिसांच्या या कारवाईमुळे आता जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांच्या तपासातून असे उघड झाले की, अशोक खरातने केलेले अत्याचार फक्त एका महिलेपुरता मर्यादित नव्हता. त्याने शेकडो महिलांवर अत्याचार केले. खरातच्या कार्यालयातून आणि फार्महाऊसमधून जप्त केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये १०० पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स जप्त करण्यात आल्या. ज्यामध्ये त्याने अनेक महिलांवर अत्याचाराचे दिसत आहे. या घटनांचे चित्रीकरण करण्यासाठी छुपे कॅमेरे वापरल्याचाही आरोप आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार, गुन्हे शाखेने जलद कारवाई सुरू केली. आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने सात तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर खरातला गुन्हे शाखा युनिट १ च्या ताब्यात दिले.

कायद्याच्या कचाट्यात अडकताच भोंदू अशोक खरात 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असं बोलू लागला आहे. मात्र याच खरातने आजतागायत मिरगाव परिसरात मोठी दहशत निर्माण केलेली होती. अशोक खरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मिरगावातील आपल्या अलिशान बंगल्यामध्ये आराम करायला यायचा. सकाळी परिसरात सायकलवरून फेरफटका मारताना तो कंबरेला बंदूक लावून फिरायचा, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. दहशतीच्या जोरावर त्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले. मात्र आता कायद्याचा दणका बसताच हाच अशोक खरात ढसाढसा रडू लागलाय आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला बोलू लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Risk: हे फळ खाल्लं तर BPचा त्रास वाढणार, आत्ताच व्हा सावध; डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Gas Leakage Safety Tips: किचनमध्ये अचानक गॅस सिलेंडर लिंक झाला? लगेच या 5 गोष्टी करा

Beed Crime News: बीडमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; बाप-लेकासह नातवावर गुन्हा दाखल

Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण

राज्यातील सत्ता बदल की सरकारमधील फेरबदल? ३० आमदारांनी गाठली दिल्ली; सरकारचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT