भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. विकृत खरातने शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. अशोक खरातचे काळे कारनामे उघड करणाऱ्या ऑफिस बॉय नीरज जाधव देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. शिर्डीत खरातचा ॲाफिस बॅाय नीरज जाधववर दाखल गुन्ह्यांत फिर्यादी महिलेची चौकशी करू नका म्हणून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकरांनी दबाव टाकला होता. संबंधित महिलेचा महिला आयोगाकडे अर्ज मागवून घेऊन पोलिसांना कारवाई करण्याची धमकी दिली होती, असा आरोप आहे. त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीमार्फत रूपाली चाकणकरांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्याच बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.