ssc, school, maharashtra, ssc marksheet, ssc result
ssc, school, maharashtra, ssc marksheet, ssc result saam tv
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनाे प्रतिक्षा संपली ! दहावीची गुणपत्रिका मिळणार 'या' दिवशी

Siddharth Latkar

सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने १७ जूनला इयत्ता दहावीचा (ssc online result) निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. त्यानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत हाेते. आता विद्यार्थ्यांची (student) ही प्रतिक्षा संपली असून येत्या साेमवारी (ता. चार जूलैला) विद्यार्थ्यांना शाळांत (school) गुणपत्रिका (ssc marksheet) दिली जाणार आहे. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माहिती दिली आहे. (ssc marksheet latest marathi news)

दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने लागल्यानंतर इयत्ता अकरावी साेडून अन्य काेर्सला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येत हाेत्या. त्यामुळे गुणपत्रिका लवकर मिळावी अशी मागणी विद्यार्थी करीत हाेते. गुणपत्रिकांची छपाई करून त्या वितरीत करण्याच्या प्रक्रियेस आठवडा लागेल असे राज्य मंडळाने स्पष्ट केले हाेते.

दरम्यान विद्यार्थ्यांची गुणपत्रिकेची प्रतिक्षा संपली असून येत्या चार जूलैला त्याचे शाळांत वाटप केले जाणार आहे. शाळांनी त्यासाठी तयारी करावी अशी सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने शाळांना केली आहे. शाळांनी दुपारी तीन नंतर विद्यार्थ्यांना शाळेत बाेलवावे आणि गुणपत्रिका द्यावी असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून जुलै - ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या ३० जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह चार जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT