Pandharpur School Girl Death
Pandharpur School Girl Death Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News : पेपर लिहताना तिसरीच्या विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : पंढरपूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात पेपर लिहित असताना एका तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आज (19 जानेवारी) सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

अनन्या भादुले असे (वय 9 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अरिहंत इंग्लिश स्कूल मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या ही तिसरीत शिकत होती. नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत गेली होती.

अनन्याचा शाळेत (School) पेपर होता. वर्गात गेल्यानंतर तिने शिक्षकांसोबत गोड गप्पा देखील मारल्या. दरम्यान, पेपर लिहत असताना तिची अचानक तब्येत बिघडली. शिक्षकांनी (Teacher) तिला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

भर वर्गात अनन्याचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनन्याच्या जाण्याने तिच्या कुटु्ंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनन्या ही दोन दिवसांपासून आजारी होती. मात्र, पेपर असल्याने पालकांनी तिला शाळेत सोडले असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT