Pune Crime News : मुल होत नसल्याने नवऱ्याने बायकोला भोंदूबाबाकडे नेलं अन्.., पुण्यातील संतापजनक घटना

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बायकोला बाळ होत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी तिला भोंदुबाबाकडे नेलं. तिथे तिच्यावर जादूटोणा करून अघोरी पूजा करण्यात आली. हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेने सिंहगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  (Latest Marathi News)

Pune Crime News
Crime News: भाऊ कामाला गेल्यावर वहिनीच्या खोलीत शिरायचा दीर; नवऱ्याला कळताच घडलं भयंकर

पुण्यातील धायरी परिसरात ही संतापजक (Crime News) घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सिंहगड पोलिसांनी पीडितेचा पती, सासू-सासरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

जयेश पोकळे, श्रेयस पोकळे, ईशा पोकळे, कृष्णा पोकळे, प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, आरोपी जयेश पोकळे याचे पीडित महिलेसोबत लग्न झाले होते.

Pune Crime News
Samruddhi Mahamarg News: सावधान! समृद्धी महामार्गावरून अतिवेगाने गाडी चालवताय? मग हा VIDEO पाहाच...

लग्नानंतर पीडितेचा घरच्यांनी अनेकवेळा मानसिक छळ केला. त्यांनी पीडितेकडे पैशांची मागणी सुद्धा केली. याबरोबरच सासरच्या मंडळींकडून महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी छळ सुरू होता. आरोपींनी इतक्यावरच न थांबता घरात भरभराटी व्हावी यासाठी पीडितेला भोंदुबाबाकडे नेले.

महिलेला मुलगा व्हावा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून तिची अघोरी पूजा देखील केली. हे सर्व पीडित महिलेच्या पतीच्या संगतमताने सुरू होते. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलिसांत (Police) धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून सिंहगड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com