Travel on Samriddhi Highway : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. एकीकडे समृद्धी महामार्गावर अतिवेगाने गाडी चालवल्याने टायर फुटण्याच्या घटना समोर येत असताना, आता आणखी एक दुसरे मोठे संकट उभे राहिले आहे. ज्यामुळे महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढू शकते. (Latest Marathi News)
नेमकं काय घडत आहे?
देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडली जात आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहे.
आता तर या महामार्गावर नीलगायींचा वावर सुद्धा वाढला आहे. महामार्गावर दिवसातून अनेकदा नीलगाई रस्ता ओलांडतात. त्यामुळे भरधाव वेगात असणाऱ्या वाहनांना अपघात (Accident) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व प्रकाराचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत.
विशेष बाब म्हणजे, सरकारकडून याबाबत कुठलेही प्रयत्न केले जात नाहीये. दुसरीकडे महामार्गावरून ताशी १५० किमी वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन भरण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे वाहनाचे टायर फुटून अपघात होणार नाही.
मुंबई - नागपूर ७ तासांत प्रवास
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून गेला आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास हा १७ तासांवरुन हे अंतर ७ तासांवर आलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.