पुणे : आवड आणि आत्मविश्वास असेल तर या जगात कुठलीही गोष्ट अवघड नाही अशी मराठीत म्हण आहे. याचाच प्रत्यय भुसावळमधून आला आहे. न्यायक्षेत्रात चांगले काम करण्याची प्रामाणिक इच्छा. योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर एका सर्वसाधारण कुटुंबातील वायरमनच्या वकील मुलाने पहिल्याच प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) पदाच्या परिक्षेत यश मिळवले आहे. (Latest Marathi News)
हितेश शांताराम सोनार (वय २९ वर्ष) असं वकील तरुणाचे नाव आहे. सोनार हे भुसावळचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शांताराम सोनार हे वायरमन म्हणून निवृत्त झाले आहेत. तर आर्इ सरोज या गृहिणी आहेत. सोनार यांच्या कुटुंबामध्ये गेल्या १० पिढ्यातही कुणी वकील किंवा न्यायाधीश नाही.
वडील शांताराम सोनार हे निवृत्त वायरमन आहेत. त्यांनी वायरमनची नोकरी करत आपल्या मुलांचे शिक्षण (Education) पूर्ण केले. ॲड. हितेश सोनार यांचे पूर्ण शिक्षण भुसावळ (Bhusawal) येथेच झाले. २०१३ मध्ये त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. त्यानंतर २०१७ मध्ये एलएलबीची पदवी घेतली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते एलएलबी विषयात सुवर्ण पदक विजते आहेत. त्यानंतर त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली.
यशाबाबत बोलताना हितेश सोनार भावूक
आपल्या यशाबाबत (Success Story) ॲड. सोनार यांनी सांगितले की, 'भुसावळमध्ये मर्यादित संधी असल्याने मी पुण्यात वकिलीची प्रॅकिटीस सुरू केली. वरिष्ठांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले. पहिल्यापासूनच कायदा आणि त्यासंदर्भातील स्पर्धा परिक्षा यांची आवड असल्याने मी तसा अभ्यास सुरू केला व पहिल्याच प्रयत्नात यश आले. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य, सहकारी मित्र आणि वरिष्ठांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचा यशात मोठा वाटा आहे'.
दोनवेळा सरकारी नोकरीची संधी सोडली
ॲड. हितेश सोनार यांच्या पत्नी भाग्यश्री सोनार या देखील वकील आहेत. सोनार दांपत्य दोघेही बरोबरच प्रॅक्टिस करतात. ॲड. सोनार यांना आत्तापर्यंत दोनदा सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली होती. मात्र न्यायक्षेत्रातच काम करायचे असल्याचे त्यांनी त्या संधी नाकारल्या आणि वकिलीच सुरू ठेवली.
दरम्यान, मुलाला देशाच्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीश म्हणून योगदान देण्याची संधी मिळाल्याने आमच्यासाठी आकाश ठेंगणे झाले आहे. आमच्या मुलाने एवढे मोठे यश मिळवले, यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये. त्याच्या यशाचा आम्हाला मोठा आनंद आणि अभिमान आहे, अशी भावना ॲड. सोनार यांच्या आर्इ-वडिलांनी व्यक्त केली.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.