Crime News : कॉलेजवरून घरी परतत होत्या तरुणी; वाटेतच घडली भयंकर घटना, एकीचा मृत्यू

कॉलेजवरून घरी येत असणाऱ्या दोन तरुणींवर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्लात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
Ratnagiri Crime News
Ratnagiri Crime NewsSaam TV

अमोल कलये, साम टीव्ही

Ratnagiri Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना, रत्नागिरी जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. कॉलेजवरून घरी येत असणाऱ्या दोन तरुणींवर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्लात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.(Latest Marathi News)

Ratnagiri Crime News
Nagpur News : भयंकर! हेडफोन लावून रेल्वेरुळ ओलांडणं बेतलं जीवावर; ट्रेनच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. राजापूर तालुक्यातील भालावली गावात ही भयंकर घटना घडली. साक्षी मुकूंद गुरव असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या हल्ल्यात (Crime News) सिद्धी संजय गुरव ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही तरुणी भालवली वरची गुरववाडी येथील राहणाऱ्या आहेत. दोन्ही तरुणी भालावली सिनियर कॉलेज धारतळे येथे शिकत होत्या. बुधवारी त्या महाविद्यालयातून घरी येत असताना, वाटेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अडवलं.

Ratnagiri Crime News
ACP Vishal Dhume : मोठी बातमी! महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंवर निलंबनाची कारवाई

शिवीगाळ करत या व्यक्तीने दोन्ही तरुणींवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्लात साक्षीचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धी नामक तरुणी गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर हल्लेखोर हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com