Shubman Gill Cricket News : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमनने दमदार द्विशतक ठोकलं आहे. त्याने १४६ चेंडूचा सामना करताना २०८ धावा केल्या. या खेळीत १९ चौकार आणि तब्बल ९ षटकारांचा समावेश आहे. या खेळीसह 'रनमशीन' गिलनं विराट कोहली, शिखर धवनचा रेकॉर्डही मोडला आहे. (Latest Marathi News)
शुभमन गिल (Shubman Gill) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने विराट कोहली आणि शिखर धवनचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. गिलने आपल्या १००० धावा १९ इनिंगमध्ये पूर्ण केल्या. यापूर्वी भारताकडून विराट कोहली आणि शिखर धवन यांनी प्रत्येकी २४-२४ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
एकूणच बोलायचे झाले तर, फखर जमाननंतर सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा शुभमन गिल हा जगातील दुसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने १८ एकदिवसीय डावात ही कामगिरी केली आहे.(Sports News)
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शुभमन गिलचे हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले होते.
गिलने कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवच्या साथीने गिलने चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. या सामन्यापूर्वी शुभमन गिलला १०० धावा पूर्ण करण्यासाठी १०६ धावांची गरज होती. त्याने चौकार मारून एक हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
भारताचे न्यूझीलंडसमोर ३५० धावांचे आव्हान
दरम्यान, युवा फलंदाज शुभमन गिल याच्या दमदार खेळीच्या बळावर भारत आणि न्यूझीलंड विजयासाठी ३५० धावांचे आव्हान उभे केले आहे. भारताकडून शुभमन गिल २०८, रोहित शर्मा ३४, सूर्यकुमार यादव ३१, तर हार्दिक पांड्याने २८ धावा केल्या आहेत. दरम्यान, न्यूझिलंड या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.