Shubman Gill Double Century: तुफान आलंया... ८ षटकार, १९ चौकारांसह शुभमन गिलचं वादळी द्विशतक, VIDEO

टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने न्यूझिलंडविरोधात दमदार द्विशतक ठोकलं आहे.
Shubman Gill Double Century
Shubman Gill Double CenturyBCCI, Twitter

Shubman Gill Double Century : टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने न्यूझिलंडविरोधात दमदार द्विशतक ठोकलं आहे. शुभमन १४६ चेंडूत आपलं द्विशतक पूर्ण केलं आहे. आपल्या विस्फोटक खेळीत त्याने १९ चौकार आणि ९ षटकार भिरकावले. गिलने अक्षरश: न्यूझिलंडच्या गोलंदाजांच्या धुवून काढलं. अखेरच्या षटकात शुभमन २०८ धावा काढून बाद झाला. त्याच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझिलंडसमोर विजयासाठी ३५० धावांचं आव्हान ठेवलं आहे.  (Latest Marathi News)

Shubman Gill Double Century
Suryakumar yadav : सूर्यकुमारला एकदिवसीय सामन्यात करिष्मा दाखवण्याची संधी; ODI विश्वचषकातही होऊ शकते एन्ट्री

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हैदराबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीसाठी उतरलेल्या रोहित शर्माने युवा फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) साथीने भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली.

कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने आजच्या सामन्यात ३८ चेंडूत ३४ धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या खेळीत २ षटकार आणि ४ चौकार लगावले. (Sports News)

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला विराट कोहली फक्त ८ धावा काढून माघारी परतला. केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या इशान किशनलाही फारशी चमक दाखवता आली नाही. लॉकी फर्ग्यूसनने वेगवाग गोलंदाजी करत त्याला अडचणीत आणले. किशन फक्त ५ धावाच करू शकला. भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवलाही (Suryakumar Yadav) चांगली सुरूवात मिळाली. मात्र ३१ धावा काढून तोही माघारी परतला.

एकीकडे भारतीय संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना, दुसऱ्या बाजून शुभमन गिलने आपली फटकेबाजी सुरू ठेवली. त्याने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर शुभमन गिल आणखीच आक्रमक झाला. त्याने न्यूझिलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: धुवून काढलं. १८८ धावांवर असताना, गिलने सलग दोन षटकार ठोकत आपलं द्विशतक पूर्ण केलं. शुभमन गिल हा वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा १०वा फलंदाज ठरला आहे.

भारताचे न्यूझिलंडला ३५० धावांचे आव्हान

दरम्यान, युवा फलंदाज शुभमन गिल याच्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझिलंडसमोर विजयासाठी ३५० धावांचे आव्हान उभे केले आहे. भारताकडून शुभमन गिल २०८, रोहित शर्मा ३४, सूर्यकुमार यादव ३१, तर हार्दिक पांड्याने २८ धावा केल्या आहेत. दरम्यान, न्यूझिलंड या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com