Beed Farmer Letter News
Beed Farmer Letter News विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Farmer News: सावकाराच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्याच्या मुलीची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक, पत्र वाचून डोळे पाणावतील...

विनोद जिरे

बीड: खाजगी सावकारीचा फास शेतकऱ्यांचा गळा आवळतोय. बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील पुनंदगाव येथील शेतकऱ्याने, आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी खासगी सावकरांकडून 8 लाख 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र शेतकऱ्याने कर्ज परत फेडूनही सावकाराने जमीन परत दिली नाही. मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलेल्या मुलीला सासरच्या मंडळीनी नांदवलं नाही. 10 व्या दिवशी मुलगी घरी आली, त्यामुळे हा शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. आपल्या शेतकरी बापापुढचं संकट पाहून या मुलीनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहीलं आहे. "मुख्यमंत्री साहेब माझ्या वडिलांच्या गळ्याचा फास थांबवा" म्हणत ढसाढसा रडत शेतकऱ्यांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांनी आर्त हाक दिली आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खाजगी सावकार शेतकऱ्यांचा गळा घोटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Beed Latest News)

बीड जिल्ह्यातील पुनंदगावचे शेतकरी शेखर सावंत यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. शेती करुन कुटुंबाची गुजराण करणाऱ्या शेखर सावंत यांच्या मोठ्या मुलीसाठी स्थळ आले. कोरोनाचे संकट, लॉकडाऊन यामुळे आर्थिक चणचण असल्याने लग्न करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून त्यांनी स्थळ नाकारले. मात्र, गावातीलच एका सावकाराने मध्यस्थी केली आणि लग्नासाठी मी उसने पैसे देतो असं आश्वासन दिलं, तेव्हा मुलीचं लग्न जमलं. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी पैसे पाहिजे असेल तर जमिनीची रजिस्ट्री करुन दे म्हणत या सावकाराने शेतकऱ्याला गळ घातली. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. लग्न जवळ आल्याने नाईलाज म्हणून शेखर यांनी दोन एकर जमीन असे लिहून दिले. त्या बदल्यात साडेआठ लाख रुपये कर्ज घेतले. (Maharashtra News)

लाडक्या लेकीचे लग्न थाटामाटात उरकले, 5 लाख रुपये हुंडाही दिला. मात्र अवघ्या दहाच दिवसातच सासरच्या मंडळींनी नव्या नवरीला घरातून हाकलून दिले. आज लग्न झालेली मुलगी घरात आहे. कसेबसे उधार उसनवारी करुन सावकाराचे साडेआठ लाख रुपये दिले. मात्र पैसे घेऊनही सावकाराने जमीन देण्यास नकार दिल्याने या शेकऱ्यासमोर संकटांचा डोंगर उभा ठाकला आहे. या घटनेमुळे "आज माझ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही" असं पीडित शेतकरी शेखर सावंत यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दिली आहे, मात्र प्रशासनाकडूनही आज, उद्या असं सांगितलं जात असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. (Tajya Batmya)

Pooja Shekhar Sawant Letter to CM

पीडित शेतकऱ्याचं म्हणणं आहे की, लग्नासाठी अडचण होती म्हणून गावातील खाजगी सावकाराकडून पैसे घेतले. त्यांनी वेळेवर मदत केली हे ठीक होतं, मात्र लग्न झाल्यानंतर आम्ही त्यांचे पैसे त्यांना दिलेही, तरी ते जमीन परत देत नाही. आज लग्न झालेली मुलगी नांदवली नाही म्हणून घरात आहे. लग्नासाठीचे पैसेही गेले आणि मुलगी घरात आहे, दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांना कसं जगवावं? असा प्रश्न त्यांना पडला आहे. "मुख्यमंत्री साहेब आमची जमीन आम्हाला परत मिळवून द्या.. अन्यथा आमच्यावरती आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही" अशी आर्त हात पीडित शेतकऱ्याची पत्नी मीना सावंत यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. (Breaking Marathi News)

या शेतकऱ्याची मुलगी पूजा शेखर सावंत सांगते की, पुण्याचं स्थळ आल्यामुळे मला शेतात काम करायला जावं लागणार नाही म्हणून वडिलांनी पैसे नसताना लग्न करायचं ठरवलं. ज्यांनी स्थळ आणलं होतं त्यांनीच पैसे दिले. माझी सगळी हौस-मौज पूर्ण करत लग्न थाटामाटात केलं. पाच लाख रुपये हुंडाही दिला. मात्र तरीदेखील वारंवार सासरच्या मंडळींनी तू काय आणलंस? काय आणलं असं म्हणत सासरच्यांनी नांदवण्यास नकार दिला. आज मी माहेरी आहे. परत आल्यावर मी वडिलांना विचारल्यानंतर पैशांबाबत विचारलं असता, लग्नासाठी दोन एकर जमीन गहाण ठेवून कर्ज काढलं होतं हे मला समजलं आणि त्यावेळी धक्का बसला असं पूजा यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

पुढे त्यांनी सांगितलं, नातेवाईकांकडून पैसे गोळा करुन खाजगी सावकाराला पैसे दिले. मात्र त्यांनी जमीन देण्यास नकार दिला. आज जमीन गेली, पैसे गेले आणि मी घरात आहे. त्यामुळे, माझ्या वडिलांसमोर पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यांनी दोन-तीन वेळा आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही समजून सांगितलं. शेवटी मी जन्माला आले नसते, लहानपणीच मेले असते, तर एवढी वेळ माझ्या वडिलांवर आली नसती म्हणताना त्यांना रडू कोसळले. मुख्यमंत्री साहेब माझ्या वडिलांना खासगी सावकरांच्या तावडीतून सोडवा आणि तेवढी दोन एकर जमीन परत मिळवून द्या अशी आर्त हाक पूजाने दिली आहे.

दरम्यान पूजाने या संदर्भात थेट मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांच्याविषयी आणि वडीलांविषयी जे घडले आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खाजगी सावकारांनी डोके वर काढल्याचे समोर आले असून शेतकऱ्यांचा गळा आवळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खाजगी सावकाराच्या मुसक्या आवळून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शेतकऱ्याला न्याय देणार का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जळगावमध्ये ५ अपक्ष उमेदनवारांची निवडणुकीतून माघार

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

Mumbai University Exams | मुंबई विद्यापीठ, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल!

Devendra Fadnavis On Opposition | देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

SCROLL FOR NEXT