Raj Kundra Case: पोर्नोग्राफी प्रकरणात मला अडकवलं गेलं; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची CBIकडे तक्रार

Raj Kundra Porn Racket Case: कुंद्राने आपल्या तक्रारीत असाही दावा केला आहे की, आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला एका व्यावसायिकाने त्याच्या वैयक्तिक सूडबुद्धीने रचला होता.
Raj Kundra Porn Racket Case
Raj Kundra Porn Racket CaseSaam Tv

मुंबई: पोर्नोग्राफी फिल्म निर्मितीप्रकरणी जामीनावर असलेला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. राज कुंद्रा याने केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) याबाबत तक्रार केली असून, मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला पोर्नोग्राफी प्रकरणात गोवले असल्याचा दावा त्याने आपल्या तक्रारीत केला आहे. कुंद्राने आपल्या तक्रारीत असाही दावा केला आहे की, आपल्याविरुद्धचा हा संपूर्ण खटला एका व्यावसायिकाने त्याच्या वैयक्तिक सूडबुद्धीने रचला होता. ज्याने मुंबईतील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्याला पोर्नोग्राफी रॅकेटच्या कथित खोट्या प्रकरणात अटक केली होती. (Raj Kundra Latest News)

Raj Kundra Porn Racket Case
Nagpur News: कारागृहात तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार करा; खुनातील तृथीयपंथी आरोपी उत्तम बाबा सेनापती याची मागणी

याबाबत राज कुंद्रा याने सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. सीबीआयने (CBI) त्याच्यावर दाखल केलेल्या याच गुन्ह्याची पुन्हा चौकशी करावी, जेणेकरून मला न्याय मिळेल अशी मागणी राज कुंद्रा याने केली आहे. मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासामध्ये आता ईडीचीही (ED) एन्ट्री झाली आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची (Money laundering) चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. पॉर्न फिल्मची निर्मिती करुन, त्या मोबाईल अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) गेल्यावर्षी राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती. (Tajya Batmya)

Raj Kundra Porn Racket Case
Nandurbar : खासगी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ५ जण ठार, १७ जखमी

राज कुंद्रावर आरोप आहेत की फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली होती. आणि हॉटशॉट्स नावाचे अॅप विकसित केले होते. हे हॉटशॉट्स अॅप राज कुंद्राने यूके स्थित फर्म केनरिनला २५ हजार डॉलरमध्ये विकले होते. या कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे मेहुणे आहेत. या हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीकरिता केनरिन नावाच्या कंपनीने कुंद्राच्या कंपनी विहानशी करार केला होता आणि त्याच देखभालीसाठी विहान कंपनीच्या बँक खात्यात पैशांचा व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अॅप्लिकेशन पॉर्न कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com