Nandurbar : खासगी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ५ जण ठार, १७ जखमी

धडक इतकी भीषण होती की यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Nandurbar Accident News
Nandurbar Accident NewsSaam TV

Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा शहरात एक भीषण अपघाताची घटना घडली. शहादा बायपास रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल्स आणि आयशर टेम्पो या दोन वाहनांमध्ये समोरा-समोर (Accident) धडक झाली. धडक इतकी भीषण होती की यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही भीषण घटना गुरूवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. (Nandurbar Bus Truck Accident)

Nandurbar Accident News
Petrol Diesel Prices : राजस्थानसह ४ राज्यात पेट्रोल महागलं; महाराष्ट्रात आजचा भाव काय? जाणून घ्या...

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषाचा समावेश आहे. घटनेतील सहा जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तर एका गंभीर जखमी झालेल्या बालिकेला शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघातात तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शहादा तालुक्यातून रोजगारसाठी मजुरांचे स्थलांतर सुरू आहे आज देखील पाडळदा व अलखेड येथून पुणे येथे मजुरांना घेऊन जाणारा आयशर ट्रक व शेल्टी ,शिरूड,कवळीथ, टेंभा गावातून मजुरांना गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथे घेऊन जाणारी खासगी बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. शहादा शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर नवीन बस स्थानकालगत हा अपघात झाला.

Nandurbar Accident News
Pune : MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीचा अभ्यासिकेत मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

दोन्ही वाहनांनी एकमेकांना दिलेली धडक इतकी भीषण होती की यावेळी मोठा आवाज झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये पाच जणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर पाच वर्षीय चिमुकली शहादा येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर भाजपाचे मकरंद प्रामकरंद पाटील, विनोद जैन, पंकज सोनार, जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे, मोहन शेवाळे, राष्ट्रवादीचे सुरेंद्र कुवर, आमदार पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांनीही मदत कार्यात सहकार्य केले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com