sawantwadi citizens andolan at mseb  Saam Digital
महाराष्ट्र

Sindhudurg: विद्यूत वितरण कार्यालयात सावंतवाडीकरांनी अधिका-यांना घेरले;गुरुवारी बैठकीचे आश्वासन

Andolan In Sawantwadi MSEB : यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, माजी नगरसेवक विलास जाधव यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

अवकाळी पावसात सावंतवाडी तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने संतप्त नागरिकांनी आम्ही सावंतवाडीकर या नावाखाली एकत्र येत आज उपकार्यकारी अभियंता कुमार हिंदुराव चव्हाण यांना घेरावा घातला. त्यानंतर विद्युत वितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, ठेकेदार व सर्व कर्मचारी यांची एकत्रित 30 मे या दिवशी घेण्याचे अधिक्षक अभियंता यांनी आश्वासित केल्याने आंदोलकांनी आंदाेलन मागे घेतले.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पावसाळ्यापूर्वी तुम्ही कोणती उपाययोजना केली याची माहिती द्या असे सांगून अधिकाऱ्यांना धारेवर धरले ,लाईट बंद झाल्यावर तुमचे अधिकारी फोन बंद करून ठेवतात, फोन उचलत नाही अशा तक्रारी मांडल्या. या तक्रारीवर उपकार्यकारी अभियंता हिंदुराव चव्हाण निरुत्तर झालेत जनतेचा उद्रेक होण्याची आपण वाट पाहत आहात असा आरोप यावेळी बोलताना साळगावकर यांनी केला.

सिताराम गावडे यांनी पावसाळ्यापूर्वी अगोदर तीन महिने तुम्ही विद्युत वाहिन्यांवरील धोकादायक झाडे का तोडत नाही असा सवाल उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमच्याकडे वीज चोरी वीज गळती होत नसताना आमच्यावर अधिकचा भार लादला जात आहे. ही तुमची ईस्ट इंडिया कंपनी आमची लुबाडणूक करण्यासाठी स्थापन झाली आहे असा आरोप करून यापुढे सर्वसामान्य जनतेला त्रास झाल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.

माजी आमदार राजन तेली यांनी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे नेमके कारणे कोणती त्यावर कोणती उपाययोजना केली ,आपल्याकडे मनुष्यबळ अपूर्ण आहे का? याबाबत आपण वरिष्ठांशी बोलला आहात का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले तर बबन साळकर यांनी आमदार दीपक केसरकर यांना 30 तारीखच्या बैठकीला बोलवू नका ते फुकटचे शायनिंग मारून जाणार असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

यावेळी विलास जाधव यांनी शिक्षण व मराठी भाषा मंत्री स्थानिक आमदार दिपक केसरकर यांनी पावसाळ्यापूर्वीची आठवा बैठक कधी घेतली या प्रश्नाचे उत्तर देताना ऑगस्ट २०२३ रोजी असे सांगतात सर्वजणांनी उग्र रूप धारण करत आता या वर्षीचा ऑगस्ट महिना आला तरी स्थानिक आमदार जागे झाले नाहीत का? असा सवाल केला.

माजी नगरसेवक सुरेश भोगटे,अभय पंडित राजू बेग,बंड्या तोरसेकर यांनी उपकार्यकारी अभियंतांवर प्रश्नांचा भडिमार केला. मात्र एकाही प्रश्नाचे योग्य उत्तर हिंदुराव चव्हाण देऊ शकले नाहीत. त्यामुळे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता ठेकेदार सर्व कर्मचारी यांची ग्राहकांसोबत एकत्रित बैठक 30 मे रोजी घेण्याचा शब्द अधीक्षक अभियंता यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT