satyajeet kadam appeals home minister devendra fadnavis to look into law and order of kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरातील युवा पिढी गुन्हेगारीच्या वाटेवर, सत्यजित कदमांची गृहमंत्र्यांना लक्ष घालण्याची मागणी

या घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थितीत करु लागले आहेत. या संपूर्ण घटनेचे मूळ गांजा असल्याचे सत्यजित कदम यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

कोल्हापूर शहरातील युवा पिढी वाया गेल्याची खंत आज (शुक्रवार) भाजपचे माजी नगरसेवक सत्यजित कदम (satyajeet kadam) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त करत पाेलिस यंत्रणेचा युवा वर्गावर काेणताही धाक राहिला नसून याचे खापर सरकारवर फुटण्याची शक्यता आहे. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी स्वत: ताबडताेब गुंडगिरीवर आळा बसावा यासाठी लक्ष घालावे असे आवाहन कदम यांनी केले. (Maharashtra News)

कोल्हापुरात मुळशी पॅटर्नचा थरार रंकाळा येथे काल पाहायला मिळाला. भर दिवसा सपासप वार करून झालेल्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोल्हापुरातील गुंडांची (kolhapur crime) दहशत मोबाईल मध्ये कैद झाली.

या घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थितीत करु लागले आहेत. या संपूर्ण घटनेचे मूळ गांजा असल्याचे सत्यजित कदम यांनी नमूद केले. शहर व परिसरात गांजा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. अनेक टोळ्या या गांजाच्या आहारी पडल्यामुळे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत लक्ष घालावे असे आवाहन केले.

ते म्हणाले ही गाेष्ट वेळीच थांबली पाहिजे अन्यथा कोल्हापुरात वेगळं चित्र पाहायला मिळेल. या प्रकरणी कोल्हापूर पोलिस दलातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आराेप करत त्यांच्या दुर्लक्षामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अवैद्य धंदे, गुंडगिरी आणि गांजा विक्रीचे प्रमाण वाढल्याचेही सत्यजित कदम यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात, जीप अन् दुचाकीची समोरासमोर धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; पगार ४५००० रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT