Konkan Politics: स्वतःच्या उमेदवारीसाठी राणेंची किती लाचारी, वैभव नाईकांचा किरण सामंतांना टाेला

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे मेळावे सुरु आहेत. या मेळाव्यांमध्ये दाेन्ही पक्षातील कार्यकर्ते आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी शक्तीप्रदर्शन करीत आहेत.
vaibhav naik accepts kiran samant challenge lok sabha election 2024 ratnagiri sindhurug constituency
vaibhav naik accepts kiran samant challenge lok sabha election 2024 ratnagiri sindhurug constituency saam tv
Published On

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Constituency :

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात नेत्यांची एकमेकांवर सुरु असलेले टिका टिप्पणीमुळे लाेकसभा निवडणुकीचे वातावरण तापलं आहे. आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांच्या टिकेला उत्तर देताना किरण सामंत यांनी विधानसभा निवडणुकीत नाईकांना पराभूत करुन निलेश राणेंना (nilesh rane) निवडणून आणणार असे म्हटलं हाेते. त्यावर आज (शुक्रवार) वैभव नाईक यांनी किरण सामंत (kiran samant) यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी किती प्रयत्न करावे लागताहेत. राणेंची किती लाचारी करावी लागत आहे. पहिलं तुमचं बघा अन् मग इतरांचा असा टाेला नाईकांनी सामंतांना हाणला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे मेळावे सुरु आहेत. या मेळाव्यांमध्ये दाेन्ही पक्षातील कार्यकर्ते आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी माेठ्या संख्येने उपस्थित राहत एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करीत आहेत. दूसरीकडे विराेधक देखील सेना आणि भाजप नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत.

vaibhav naik accepts kiran samant challenge lok sabha election 2024 ratnagiri sindhurug constituency
Success Story : काश्मिरी बोर लागवडीतून मिळाला बक्कळ पैसा, वाचा नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

वैभव नाईक यांनी किरण सामंत यांच्या टिकेला उत्तर देताना निलेश राणेंना निवडून आणण्याआधी स्वतःच्या उमेदवारीसाठी किती प्रयत्न करावे लागतात. राणेंची किती लाचारी करावी लागते याचा अंदाज सर्वांना आला आहे. कोणाला तरी खूश करण्यासाठीं असं बोलाव लागतंय. तुमची पैशाची ताकद कुडाळ मालवण मतदारसंघात चालणार नाही. तुमच्या लोकसभेचे पहिलं बघा नंतर विधानसभेचे बघू असे प्रत्युत्तर नाईक यांनी सामंत यांना दिले.

vaibhav naik accepts kiran samant challenge lok sabha election 2024 ratnagiri sindhurug constituency
Raju Shetti: मला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही; राजू शेट्टी धैर्यशिल मानेंवर भडकले; ठाकरेंना दोनवेळा भेटल्याचेही सांगितलं

वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना आम्ही एकनिष्ठ आणि निष्ठावंत आहोत आणि राहणारच. तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो. आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आणि तुम्ही तिथे वॉचमनगिरी करताय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे असे म्हटलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाईक म्हणाले तुमचे वडील केंद्रीयमंत्री असून देखील त्यांना तिकीट (उमेदवारी) मिळालेले नाही. आपण वॉचमन असल्याने त्यांना तिथून तिकीट देण्यासाठी प्रयत्न करावेत तरच तुमच्या वॉचमनगिरीचा आणि बॉसचा वडिलांना फायदा होईल असा सल्ला देखील नाईक यांनी नितेश राणेंना दिला.

Edited By : Siddharth Latkar

vaibhav naik accepts kiran samant challenge lok sabha election 2024 ratnagiri sindhurug constituency
Beed Constituency : बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करणं पंकजा मुंडेंनी टाळलं, कारण ही सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com