satej patil supporters beaten to rajaram factory managing director in kolhapur Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur: महाडिक-सतेज पाटलांचा वाद चिघळला; राजाराम कारखान्याच्या 'एमडी'ला कपडे फाटेपर्यंत मारहाण

Dhananjay Mahadik Vs Satej Patil : कोल्हापुरात राजाराम कारखान्याच्या व्यवस्थापकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे.

Vishal Gangurde

Kolhapur News:

कोल्हापुरात राजाराम कारखान्याच्या संचालकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. आज मंगळवारी रात्री कसबा बावड्यात मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ऊसावरून राजकारण

आज मंगळवारी सकाळी ऊस उत्पादक सदस्यांचा ऊस वेळेत नेत नसल्यावरुन सतेज पाटील यांनी उत्पादकांचा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी सतेज पाटील यांनी साखर कारखान्याने सभासदांचा ऊस येत्या आठ दिवासांत नाही नेल्यास राजाराम कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऊस नेण्यावरून राजकारण सुरु असल्याचं आरोप सतेज पाटील यांनी केला होता. कारखान्याच्या कारभारावरही सतेज पाटील यांनी टीका केली. सतेज पाटील यांच्या टीकेनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण पेटलं आहे.

सतेज पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा

सतेज पाटील यांनी सकाळी कारखान्याच्या विरोधा मोर्चा काढला. त्यानंतर आज मंगळवारी रात्री सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून राजाराम कारखान्याच्या संचालकाला मारहाण झाल्याची घटना घडली. कसबा बावड्यात संचालकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महाडिक-सतेज पाटील गटाचा वाद आणखी चिघळल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles Symptoms: डोळ्यांखाली डार्क सर्कल कोणत्या कमतरतेमुळे येतात? ही आहेत लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले

Bengali white saree: दुर्गापूजेला बंगाली महिला लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी का नेसतात? जाणून घ्या खरं कारणं

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

SCROLL FOR NEXT