Satej Patil, Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election, Mahadevrao Mahadik, Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election : भ्याले भ्याले महाडिक भ्याले... सतेज पाटील गटाचे काेल्हापूरात शक्तीप्रदर्शन; न्यायाची अपेक्षा

1 लाख 30 हजार कागदपत्र प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात दाखल.

Siddharth Latkar

- रणजित माजगावकर

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील (mla satej patil) गटाचे 29 उमेदवारांचे अर्ज नुकतेच बाद झाले. त्यामुळे आता पाटील गट आक्रमक झाला आहे. या कारखान्याचे (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Latest Updates) मॅनेजिंग डायरेक्टर आणि सहाय्यक निबंधक (डी डी आर) यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. (Breaking Marathi News)

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीच्या छाननीत सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या उमेदवारांनी थेट प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडेच तक्रार केली आहे. दरम्यान यांच्याकडे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे सभासदांनी व्यक्त केली आहे.

जर न्याय मिळाला नाही तर कारखान्याचे एमडी आणि सहाय्यक निबंधक यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवडणुकीवर सरकारचा दबाव असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सभासदांनी भ्याले भ्याले महाडिक भ्याले अशा घोषणांनी साखर सहसंचालक कार्यालय परिसर दणाणून सोडला.

1 लाख 30 हजार कागदपत्र सादर

दरम्यान राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अवैध ठरवलेल्या 29 उमेदवार पात्र असल्याबाबतचे 1 लाख 30 हजार कागदपत्र आज आमदार सतेज पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे सादर केली आहेत अशी माहिती सर्जेराव माने (माजी चेअसरमन) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीत पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT