Satara Doctor Case Saam Tv
महाराष्ट्र

Satara Doctor Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Satara Female Doctor Death Case Update: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फलटण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. प्रशांत बनकरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Priya More

Summary -

  • सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पहिली अटक

  • प्रशांत बनकरला पोलिसांनी केली अटक

  • डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये दोघांवर बलात्कार आणि छळाचे गंभीर आरोप

  • फलटण पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षकासह प्रशांत बनकरवर केला होता गुन्हा दाखल

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली. प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फलटण पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिस या दोघांचा शोध घेत होते. अखेर एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावं होती. या दोघांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा तसंच बलात्कार केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या दोघांविरोधात शुक्रवारी फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार होते. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेला आरोपी प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर फलटणमध्ये ज्या घरामध्ये राहत होती त्या घरमालकाचा मुलगा आहे. पोलिस उपनिरीक्षकासह प्रशांत बनकरने देखील डॉक्टरला त्रास दिला होता. गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच्या त्रासालाच कंटाळून महिला डॉक्टरने आयुष्य संपवले. गुरूवारी महिला डॉक्टरने फलटणमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवले.

आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने तळ हातावर पेनाच्या सहाय्याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहिली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि फाशी देण्यात यावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणामुळे राजकारण देखील तापले आहे. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवर देखील आरोप केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Delhi Bomb Blast Update: बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ला मोठं यश; उमरसोबत कट आखणाऱ्या i20 कारच्या मालकाला अटक

SCROLL FOR NEXT