निवडणुकीपूर्वी माजी रेल्वे मंत्र्यांच्या परिवाराला धक्का, IRCTC हॉटेल प्रकरणात अख्ख कुटुंब अडकणार

Lalu Prasad Yadav and Family: लालू प्रसाद यादव, राबडी देवी अन् तेजस्वी यादव यांच्यावर हॉटेल घोटाळा प्रकरणात आरोप निश्चित झाले आहेत.
Lalu Prasad Yadav and Family
Lalu Prasad Yadav and FamilySaam
Published On
Summary
  • लालू प्रसाद यादव, राबडी देवी अन् तेजस्वी यादव यांच्या अडचणीत वाढ.

  • आयआरसीटीसी हॉटेल घोटाळा प्रकरणात आरोप निश्चित.

  • यादव परिवार न्यायालयात हजर.

विधानससभा निवडणुकापूर्वी बिहारमध्ये राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच बिहारच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसणार आहे. कारण, आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार प्रकरणात तिघांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील राऊज अव्हेन्यू येथील विशेष न्यायालयाने आयआरसीटीसी हॉटेल भ्रष्टाचार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, १२० आणि पीसी अॅक्ट अंतर्गत आरोप निश्चित केले आहे. हे प्रकरण रांची आणि पुरी येथील आयआरसीटीसी हॉटेलच्या टेंडर वाटपातील गैरव्यवहाराशी संबंधित आहे.

Lalu Prasad Yadav and Family
लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, रेल्वेमंत्री असताना लालू यादव यांनी या हॉटेलच्या टेंडरच्या बदल्यात आपल्या कुटुंबियांना फायदा होईल, असे जमिनीचे व्यवहार केले होते.

Lalu Prasad Yadav and Family
शिंदे सेनेच्या फरार नेत्यावर गुन्हा; रॅप साँग, गँगस्टर अन् PP कंपनीचा उल्लेख; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

लालू यादव आज व्हीलचेअरवरून न्यायालयात हजर झाले. त्यांच्यासोबत पत्नी राबडी देवी, पुत्र तेजस्वी यादव देखील उपस्थित होते. या सुनावणीत न्यायालयाने आयआरसीटीसी हॉटेल घोटाळा आणि नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात निश्चित केले आहे.

Lalu Prasad Yadav and Family
खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, ५ महिलांवर कोयता अन् कुऱ्हाडीनं वार; नेमकं कारण काय?

२४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. दोन्ही प्रकरणांमधील युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणांमधील निकालाचा आगामी बिहार विधानसभा निव़डणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीआहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com