शिंदे सेनेच्या फरार नेत्यावर गुन्हा; रॅप साँग, गँगस्टर अन् PP कंपनीचा उल्लेख; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

Shivsena Shinde Group Former Corporator: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक पवन पवार यांच्यावर गुन्हा दाखल. रॅप साँगद्वारे दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल.
Shivsena Shinde Group Former Corporator
Shivsena Shinde Group Former CorporatorSaam
Published On
Summary
  • नाशिक पोलिसांकडून राजकीय गुंडांवर कारवाई.

  • शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल.

  • व्हायरल रॅप साँगद्वारे दहशत माजवल्याप्रकरणी पवन पवार पोलिसांच्या रडारवर.

नाशिक पोलिसांनी राजकीय गुंडांवर कारवाई करण्याचा विडा उचलला आहे. अलिकडच्या काळात नाशिक पोलिसांनी अनेक राजकीय गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. काही गुंड फरार आहेत. त्यांचा शोध सध्या नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. भाजपचे मामा राजवाडे, भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तसेच शिवसेना शिंदे गटातील कुख्यात गुंड पवन पवार आणि विशाल पवार हे देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. रॅप साँग तयार करून व्हायरल करून दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी पवन पवार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पवन पवार सध्या फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहे. पवन पवार याच्यावर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नावे आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. रॅप साँग तयार करून सोशल मीडियात व्हायरल करून दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी पवन पवारविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Shivsena Shinde Group Former Corporator
डोंबिवलीत रेल्वे रूळावर भयंकर घडलं, भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारून तरूणानं आयुष्य संपवलं

पवन पवार हे शिवसेना शिंदे गटातील नेते आहेत. ते माजी नगरसेवक होते. त्यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर झाले आहेत. नुकतंच त्यांचा रॅप साँगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पवन पवार दिसत आहे. त्यांच्या शेजारी एक तरूण रॅप साँग गात आहे. या रॅप साँगमध्ये त्या तरूणानं'पीपी कंपनी, सीव्हि कंपनी आणि गँगस्टर शब्दाचा उल्लेख केला आहे.

Shivsena Shinde Group Former Corporator
RSS सदस्यांकडून लैंगिक छळ अन् काठीनं मारहाण, इंजिनिअरनं लॉजवर उचललं टोकाचं पाऊल, १५ पानांवर संघावर आरोप

हा रॅप साँग व्हायरल होताच पोलिसांनी माजी नगरसेवक पवन पवार याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पवन पवार फरार असून, पोलिसांकडून शोध सुरू आहे. पवन पवार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद त्यांच्या नावावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com