ajit pawar, shambhuraj desai, patan, satara saam tv
महाराष्ट्र

Satara News : मर्यादा पाळा, अन्यथा मला बंधनं झुकागरुन बाेलावं लागेल; शंभूराज देसाईंनी अजित पवारांना ठणकावले (पाहा व्हिडिओ)

रविवारी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा मेळावा झाला.

Siddharth Latkar

- संभाजी थाेरात / ओंकार कदम

Satara News : मी स्वत:हून माझ्यावर बंधन घातली आहेत, परंतु हे जर असेच चालू राहिले तर मलासुद्धा मर्यादा झुगारुन बाेलावे लागेल असा खणखणीत इशारा साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे (ncp) नेते राज्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार यांना दिला. विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) हे रविवारी काेयनानगरला एनसीपीच्या मेळाव्याला आले हाेते. त्यावेळी त्यांनी देसाईंवर टीका केली हाेती. या टिकेचा समाचार साता-यात (satara) मंत्री देसाई यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेतला. (Maharashtra News)

काेयनानगर (satara) येथे विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी एकनाथराव शिंदेंनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. आपण यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत विचारांत वाढलो आहे अशी बाेचरी टीका मुख्यमंत्र्यांवर केली हाेती.

मंत्री देसाईंवर बाेलताना अजित पवार यांनी देसाईंच्या शड्डू ठाेकण्याच्या स्टाईलवर टीका केली. ते म्हणाले त्यांची तब्येत तरी बघा असे म्हटलं हाेते.

त्यावर मंत्री देसाई म्हणाले अजित पवारांनी अत्यंत नैराश्येतून भाषण केलं. अजित पवारांचे थंड झालेलं स्वागत आणि सभागृहात 2 हजारांपेक्षा जास्त माणसे सभागृहात नसावेत. अजित दादांनी नैराश्यातून माझ्यावर टीका केली. एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात हे त्यांनी विसरु नये.

दादा तब्येत माझी कशी ही असली तरी एकदा शड्डू ठोकून थांबणारा शंभूराज देसाई नाही यानंतर सुद्धा दहा वेळा शडू ठोकायची माझी तयारी आहे असेही देसाईंनी नमूद केले. अजित दादा आणि माझी जुनी मैत्री आहे म्हणून अजून सुद्धा मी शांत आहे असेही देसाईंनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी जमालगोटा शब्दचा वापर हा असंसदीय असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी केल्यानंतर त्याला मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे.

नवीन लोकसभेचा इमारतीचे उद्घाटन होते आहे त्यावर काही विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम बघून पोटशूळ उठला आहे तो शमविण्यासाठी मुखमंत्री ग्रामीण भागातील असल्याने त्यांनी ग्रामीण प्रचलित शब्द जमालगोटा हा शब्द वापरला आहे.

त्यामुळे अजित पवारांनी याचे भांडवल करणे योग्य नाही. यापूर्वी अजितदादांकडून अनेक वेळा वेगवेगळे शब्द प्रयोग झाले होते याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देसाईंनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT